maharashtrapoliticalsocialsolapur

आयुक्त डाॅ सचिन ओंबासे यांचा राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत सत्कार…

सोलापूर

महानगर पालिकेचे नुतन आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचा फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला सोलापूर शहरातील महत्त्वाचे मुलभूत प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..
सोलापूर शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी आदरणीय राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत बैठक लावून मुलभूत सुविधा विकास कामासंदर्भात निधीची तरतूद करण्यासाठी आम्ही प्रशासकीय प्रयत्न करतोच आहोत आपण ही आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे आवाहन आयुक्त ओंबासे यांनी शिष्टमंडळास केले .
आदरणीय अजित पवार यांनी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री म्हणून स्वतः जबाबदारी स्वीकारली असून सोलापूर शहरातील विकासाकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजितदादांकडे निश्चितच पाठपुरवठा करण्यात येईल आश्वासन शिष्टमंडळाने दिले….

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे महीला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे जेष्ठ नेते हेमंत दादा चौधरी नगरसेवक गणेश पुजारी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख सहकार अध्यक्ष भास्कर आडकी मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे युवक संघटक दत्तात्रय बडगंची चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर मदत कक्ष बसवराज कोळी ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष आयुब शेख प्रज्ञासागर गायकवाड दत्तात्रय बनसोडे यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button