Super fast news:- बीडच्या चोरांचा सोलापुरात उच्छाद फौजदार चावडी पोलिसांकडून चैन स्नेचिंग गुन्हा उघडकीस….
आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी....

सोलापूर
या प्रकरणात फिर्यादी रूपाली संतोष
अहिरसिंग राहणार ०७ डांगे नगर बाळे सोलापूर ह्या दिनांक ६/०५/२०२५ रोजी रात्री ८:१५ मिनिटाच्या सुमारास त्यांच्या ॲक्टिव्हा स्कुटीवरून त्यांच्या मुलीस बाळ्याकडे जात असताना लोखंडी पादचारी पुलाच्या पुढे मडकी वस्ती येथे आल्या असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमापैकी मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी रूपाली संतोष अहिरसिंग यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्ती हिसकावून पळवून नेले होते . याबाबत रूपाली संतोष अहिरसिंग यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
फौजदार चावडी पोलिसांकडून या घटनेचा तपास जलद गतीने सुरू होता.हा तपास सुरू असतानाच या पूर्वी घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींच्या शोधात असताना पोलिसांना एक आरोपी निष्पन्न झाला. तपासात CCTV फुटेज मध्ये आरोपी निष्पन्न झाले. बीड जिल्ह्यातील हे ५ आरोपी असल्याचे पोलिसांना आढळून आले. गुप्त बातमी दारा या आरोपींची माहिती काढली असता गुन्ह्यातील ५ आरोपी पैकी ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले .
*अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे*
*१) राहुल राजाराम गायकवाड वय वर्ष २०*
*२) प्रकाश गंगाधर धोत्रे वय वर्षे २४*
*३) अंबादास उर्फ अमोल अंकुश गायकवाड वय २१ वर्ष*
*४) सागर नवनाथ जाधव वय वर्षे २१*
*५) विकास रमेश जाधव वय वर्ष २१*
सर्वच जण राहणार राहणार दगडी शहाजनपूर पांगरी रोड बीड ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांच्या इतर दोन साथी दारांसमवेत गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. अटकेतील आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी मे.न्यायालयाने ठोठावली आहे.आरोपींकडून एकूण ७.०५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी व तीन स्मार्टफोन असा एकूणच ५ लाख ९६ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये पोलिस उपायुक्त डॉ विजय कबाडे,सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने ,दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे ,पोलिस हवालदार प्रवीण चुंगे ,बसवराज परिट, पोलिस नाईक शिवानंद भिमदे, आयाज बागलकोटे ,पोलिस कॉन्स्टेबल विनोद व्हटकर, कृष्णा बडूरे, विनोद कुमार पुजारी,अमोल खरटमल , ज्ञानेश्वर गायकवाड , शशिकांत दराडे, अर्जुन गायकवाड , तौसीफ शेख,आतिश पाटील, अजय चव्हाण , सचिन लवटे, सुधाकर माने , सुरज सोलवणकर यांनी ही कामगिरी यशस्वी पणे पार पाडली…