शिवजयंतीत उत्सव अध्यक्ष Ca सुशील बंदपट्टे यांनी घेतलेल्या उपक्रमाची सोलापूर शहर – जिल्ह्यात चर्चा ….
ऐतिहासिक सुवर्ण पाळणा सोहळ्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा....

सोलापूर
सालाबाद प्रमाणे यंदाही शिवजयंती निमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्राण प्रतिष्ठापना करून विविध उपक्रमांवर यंदा विशेष भर दिला.दरवर्षी महिला शिव भक्तांकडून या जयंती दरम्यान हिरहिरीने सहभाग नोंदवला जात आहे .
यंदा महिला शिवभक्तांकडून महिलांचीच मोटार सायकल रॅली काढण्यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. उत्सव अध्यक्ष ca सुशील बंदपट्टे यांनी याबाबत शिंदे चौक डाळिंब आड येथे महिलांची बैठक आयोजित करून मत जाणून घेतली . त्यानंतर ca सुशील बंदपट्टे यांनी जुना पुना नाका येथून शिव शोभा यात्रेचे आयोजन केले होते.या शोभा यात्रेत महिला शिव भक्तांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्ती ची महाआरती संपन्न झाली.आयोजित जंगी कुस्त्यांना ही पैलवानांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला .पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने मिरवणुका आनंदी वातावरणात पार पडल्या. Ca सुशील बंदपट्टे यांनी पूर्वनियोजित उत्कृष्ट असे नियोजन केले होते. बंदपट्टे यांना श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पूर्णपणे सहकार्य लाभले.
हा उत्सव श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर { नाना} काळे यांच्या सर्वच प्रमुख सल्लागार पदाधिकारी यांनी पाळणा सोहळा दिमाखदार वातावरणात संपन्न करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शिव भक्तांनी उत्सव अध्यक्ष ca सुशील बंदपट्टे यांनी यंदा घेतलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले….