परिमंडळ अ विभागातील रेशन धान्य वाटपात सावळा गोंधळ….

सोलापूर
मागील काही महिन्यापासून सोलापूर शहरात नवनिर्वाचित अन्नधान्य वितरण अधिकारी रुजू झाल्यापासून रेशन दुकानदाराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मग ते ई के वाय सी असो किंवा अन्न सप्ताह दिन अश्या शासनाच्या उपक्रम राबविण्यात अन्नधान्य वितरण अधिकारी यांना चांगलेच यश प्राप्त झाल्याने सोलापूर शहर धान्य वाटपात महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकाविले आहे.
तर दुसरीकडे सोलापूर शहरात विविध ठिकाणी अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या वर भरारी पथक नेमून दोन वेळा कारवाई केल्याने अवैधरित्या गॅस पॉईंट चालविण्याऱ्यानी देखील चांगलेच धासकी घेतली होती,इतक्या पारदर्शकता वातावरणात परिमंडळ अ विभागातील दुकानदारांनी मात्र धान्य वाटपात सावळा गोंधळ घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुख्यमंत्री योजनेअंतर्गत साडी वाटप न करता परस्पर विलेव्हाट लावणे,तर काही दुकानदार अंत्योदय लाभार्थीना पूर्ण धान्य देत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.ह्याबाबत अन्न धान्य वितरण अधिकारी ह्यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य पीडित लाभार्थी कडून होत आहे.ह्या आधी नागरिकांच्या अश्या तक्रारी वरून मागील अन्न धान्य वितरण अधिकारी हे भरारी पथक नेमून दोषी दुकानदारावर कारवाई करत असतं त्यामुळे दुकानदारावर चांगलाच आळा बसत होते.
आता आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने अन्नधान्य वितरण अधिकारी भरारी पथक नेमून घडत असलेल्या प्रकाराची शहानिशा करून सर्वसामान्य लाभार्थीना न्याय मिळवून देतील का ? ह्या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.