सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागातील सहा अभियंता नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता खानापुरे रा. सोलापूर यांची जामीनासाठी सोलापूर येथील सत्र न्यायालय मध्ये धाव….

सोलापूर –
थोडक्यात हकीकत अशी की,जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 यादरम्यान महापालिकेतील बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता झाकीर नाईकवाडी व कनिष्ठ अभियंता खानापुरे हे महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी म्हणून काम पाहत होते त्या काळात त्यांनी अधिकार नसताना बांधकाम परवाने दिले व महापालिकेचे नुकसान केले. याप्रकरणी बांधकाम विभागाचे अभियंता बसवराज मठपती यांनी पोलिसात तक्रार दिली होती सदरकामी 18 फेब्रुवारी रोजी सदर बझार पोलिसांनी नाईकवाडी आणि खानापुरे यांना अटक केली होती.करून सोलापूर येथील न्यायाधीश श्री भंडारी यांनी दोघांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नाईकवाडी व खानापुरे यांनी एडवोकेट शशी कुलकर्णी यांचे मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय मध्ये खालील मुद्द्यांवर जामीन अर्ज दाखल केला.
ॲड.शशी कुलकर्णी. ॲड. गुरुदत्त बोरगांवकर
1 आरोपीने कोणतेही गैरकृत्य केलेले नाही.
2.आरोपी हे हे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले आहेत.
3. आरोपी हे पोलीस तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत.
4. आरोपीकडून काही जप्त करायचे नाही.
5. आरोपी हे महापालिकेचे अधिकारी आहेत.
6. आरोपीना जेल मध्ये ठेवण्यासाठी कोणतेही कारण उरलेले नाही.
या प्रमुख मुद्द्यांवर जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जावर सरकारी वकिलांचे म्हणणे मागविले असून त्याची पुढील सुनावणी सत्र न्यायाधिश श्री मोहिते साहेब यांचे समोर दि. 12/03/2025 रोजी होणार आहे.
सदर कामी आरोपींतर्फे ॲड. शशी कुलकर्णी. ॲड .गुरुदत्त बोरगावकर, ॲड .रणजित चौधरी..