maharashtrapoliticalsocialsolapur

विकास, रोजगार निर्मिती, गुंतवणूक, उद्योग वाढ यावर भर देणारा अर्थसंकल्प:~ आमदार विजयकुमार देशमुख….

विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहिल्याचे अर्थसंकल्पा मध्ये दिसून येते. महाराष्ट्राच्या आजच्या अर्थसंकल्पात विकास, रोजगार निर्मिती, गुंतवणूक, उद्योग वाढ यावर भर देणारा अर्थसंकल्प आहे.
निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकर्‍यांना मोफत विज देणार, लाडकी बहिण हि योजना शास्वतपणे सुरु राहणार, सोलापुर शहरातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपुर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.

 

१७ विभागांकडून देण्यात येणाऱ्या १४१ सेवा आता ‘मैत्री’ या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहेत.

कमी दरात वीज पुरवठा

ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे. यामुळे, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील.

१०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला. या कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभजीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम, पारदर्शक, गतिशील, लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल, याची खात्री आम्हाला आहे.

 

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थांकडून करवून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विजय सि. देशमुख
आमदार सोलापूर शहर उत्तर विधानसभा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button