महिलेचा गळा दाबुन खुन, तरुणाची निर्दोष मुक्तता

सोलापूर :-
रजनीकांत ऊर्फ राजु चंद्रकांत शंके वय ३५ वर्षे, रा. न्यु लक्ष्मी चाळ देगांव रोड सोलापूर या तरुणाची, एका महिलेचा गळा दाबुन खुन केल्याप्रकरणी सोलापूर येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत कि, यातील आरोपी रजनीकांत हा सदर महिलेच्या घरालगतच्या भागात राहण्यास होता, सदर महिलेवर तो एकतर्फी प्रेम करत होता, दि. ३१/१०/२०१९ रोजी सदर महिला ही दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर पडली असता सदर आरोपी रजनीकांत याने, तिला यश नगर भागात नेऊन, गळा दाबुन तिचा खुन केला अशा आशयाची फिर्याद मयताचे वडिलांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. त्यावर गुन्हा नोंद होऊन आरोपीस दि. ०७/११/२०१९ रोजी अटक झाली होती. त्यामध्ये पोलीस निरिक्षक एस.डी. माने यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणीत सरकार पक्षाने एकुण १४ साक्षीदार तपासले.
त्यामध्ये मयताचे नातेवाईक, पंच, डॉक्टर, पोलीस अधिकारी, लॉज व्यवस्थापक इत्यादींच्या महत्वपुर्ण
ॲड. शशी कुलकर्णी
साक्षी झाल्या. त्यामध्ये सरकार पक्षाने युक्तीवाद केला कि प्रकरणात आरोपीने खुनाचा गुन्हा केल्याबद्दल भक्कम पुरावा आला असल्याने आरोपीला दोषी ठरविण्यात यावे अशी सरकार पक्षाने मागणी केली. याउलट आरोपीचे वकिल अॅड. शशी कुलकर्णी यांनी युक्तीवाद करताना कोर्टाचे निदर्शनास आणून दिले की, आरोपी व मयत यांच्यामध्ये कोणतेही भांडण, वितुष्ट नव्हते, त्यामुळे त्या महिलेस जिवे मारण्याचा आरोपीचा हेतू असु शकत नाही, प्रत्यक्ष घटना पाहणारा कोणीही साक्षीदार नाही, स्वतंत्र साक्षीदार कोणीही घटनेबाबत सांगत नाही, जे पुरावे उपलब्ध आहेत असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे, ते पुरावे भक्कम व फक्त आरोपीनेच गुन्हा केल्याचा निष्कर्ष काढणे इतपत पुरेसा नाही, साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती असून ती विसंगती आरोपाबद्दल संशय निर्माण करते, त्यामुळे आरोपीने गुन्हा केला असे म्हणता येत नाही, अशा प्रकारचा युक्तीवाद केला. तसेच सदरची केस परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असल्याने, सदर केसमध्ये “शरद सारडा विरुध्द सरकार” या सर्वोच्च न्यायालयाचे एका केसमधील उल्लेख केलेली पाच तत्वे (पंचशील) यामध्येही सदर खटला सिध्द होत नाही.
त्यामुळे आरोपी विरुध्दचा गुन्हा शाबीत होऊ शकत नाही, त्यामुळे आरोपीला निर्दोष मुक्त करावे असा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद विचारात घेऊन सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. स्वप्निल सरवदे, अॅड. पौर्णिमा शंके, अॅड. विनित गायकवाड, अॅड. प्रणव उपाध्ये, अॅड. आदित्य आदोने यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे अॅड. प्रदिपसिंह रजपुत (जिल्हा सरकारी वकिल) यांनी काम पाहिले.
से.के. नं:- ४९/२०२०
कोर्ट :- अति. सत्र न्यायाधिश श्री. योगेश राणे साहेब