पुरुषोत्तम बन्ने खून प्रकरणातील आरोपी अजित आडके चा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला:– जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत….

या प्रकरणात सविस्तर हकीकत अशी की, दि. २१.०६.२०२ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मौजे बाळे, ता. उ. सोलापूर येथील गट नंबर ४१/३ या शेतामध्ये यातील फिर्यादी, मयत व साक्षीदार हे त्यांच्या शेतीची शासकीय मोजणी करत असताना शांतप्पा यशवंत आडके, सागर शांतप्पा आडके, विजयकुमार उर्फ बाळू शांतप्पा आडके, महादेव सदाशिव धवाले, अमित उर्फ पप्पू आप्पासाहेब आडके अमित आप्पासाहेब आडके यांनी त्याच्यातील शेतीच्या वादातील राग मनात धरुन ही शेती आमची आहे, मोजणी करायची नाही, नाहीतर एकेकाला सोडणार नाही, नाहीतर या हरामखोरांना संपवू असे म्हणून या सर्वानी एकत्ररित्या त्यांच्या हातातील लोखंडी कोयता, लोखंडी पाईपने मयतास डोक्यावर, दोन्ही हातापायावर, कंबरेवर, शरीरावर वार करुन त्यास गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच यातील फिर्यादीस देखील लोखंडी पाईपने उजव्या खांदयावर, डाव्या पायाच्या पिंडरीवर मारहाण करुन जखमी केले होते.
म्हणून यातील फिर्यादीने सदर आरोपींविरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३०७ व अन्य कलमान्वये फिर्याद दिले होते. दरम्यानच्या काळात यातील मयतास उपचाराकरीता रिक्षाने सिध्देश्वर हॉस्पीटल व त्यानंतर वळसंगकर हॉस्पीटल येथे दाखल केले असता, मयत हा उपचार चालू असताना दि.२३.०६.२०२४ रोजी मृत्यू पावला. तदनंतर सदर आरोपीच्या विरोधात भा.द.वि. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील ५ आरोपींना अटक केली. सदर गुन्हयातील आरोपी अजित आडके हा अदयाप फरार आहे. त्याने त्यास अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता.
सदर अटकपूर्व जामीन अर्जास सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. प्रदिपसिंग राजपूत यांनी तीव्र हरकत घेऊन म्हणणे सादर केले होते.
सदर आरोपी अजित आडके याचे अटकपूर्व जामिनाचे अर्जावर युक्तीवाद करताना सरकारी वकील श्री. राजपूत यांनी सांगितले की, सदर घटना घटनास्थळाचा पंचनामा वरुन सदरची घटना घटनास्थळावर घडल्याचे दिसते. सदर मयताचे रक्तांने माखलेले कपडे जप्त करुन पंचनामा करण्यात आला आहे. तसेच आरोपी अमित यांनी गुन्हयात वापरलेली शखे काढून दिलेले आहेत, मयताचा शव विच्छेदन अहवालमध्ये मयताच्या अंगावर १८ जखमा दिसून आलेले आहेत. सदर प्रकणामध्ये शासकीय साक्षीदार व इतर नेत्र साक्षीदार आहेत. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याची जामिनावर मुक्तता झाल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकेल व साक्षीदार फोडण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर करण्यात यावा, असा युक्तीवाद केला असता सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापूर येथिल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मनोज शर्मा साहेब यांनी आरोपी अजित आप्पासाहेब आडके याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड. शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले आहे.