maharashtrapoliticalsocialsolapur

पुरवठा विभागातील भ्रष्ट परिमंडळ अधिकारी अनिल गवळी यांच्या नाहक त्रासाला कंटाळून सोलापूर शहरातील रेशन दुकानदारांचा एक एप्रिल पासून संप..

सोलापूर

पुरवठा विभाग आणि त्या अंतर्गत असलेल्या रास्त भाव दुकान म्हंटल की शिधापत्रिकाधारक यांचे रेशन दुकानदार बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असणारे प्रणाली.दुकानदार धान्य वाटप करत नाहीत, दुकान वेळेवर उडत नाहीत अशा एक ना अनेक तक्रारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे असतात. पण आता मात्र चक्क रेशन दुकानदारांनीच परिमंडळ अधिकारी ब विभाग अनिल गवळी यांच्या विरोधात तक्रारीचे शस्त्र उगारले आहे. परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील गरजू शिधापत्रिकाधारकांचे नाव कमी -जास्त,दुबार व नवीन शिधापत्रिका देणे, अश्या मूलभूत गरजा पुरवणारे त्याचप्रमाणे ग्राहकांना वेळेत व काटेकोरपणे धान्य वाटप करण्याऱ्या रेशन दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यालय असते.

 

मात्र तेच परिमंडळ अधिकारी यांनी स्वतःचे उखळ पांढरे करीत दुकानदारांना महिन्याला हप्ताच बसवल्याचे महाराष्ट्रात पहिल्यांच दुकानदाराने अधिकाऱ्यां विरुद्ध तक्रार दिल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे.

 

 

याबाबत सोलापूर जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या अंतर्गत असलेल्या परिमंडळ ब विभागातील 82 रास्त भाव धान्य दुकानदार असून शासनाच्या नियमाप्रमाणे रास्त भाव धान्य दुकानात नियमितपणे धान्य वाटप करणे, त्याचप्रमाणे शासनाच्या प्रत्येक उपक्रम ई केवायसी,आधारसिडींग, मोबाईल सिडींग,भारत आयुष्यमान कार्ड अशा वेगवेगळ्या यशस्वी उपक्रम राबवित आहे. परंतु दैनंदिन जीवनात हा व्यवसाय करत असताना काही असंतुष्ट तक्रारदार बिनबुडाच्या आरोप करत नेहमीच काही ठराविक दुकानदारांचे तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे करत असतात. त्या अनुषंगाने परिमंडळ अधिकाऱ्याकडून तपासणीचे पत्र व त्यावर दुकानदारांना नोटीसाचे भीती दाखवून रेशन दुकानदारा कडून सतत पैशाची मागणी करत आहेत.

 

 

ही बाब इतकच थांबले नसून प्रत्येक महिन्याला परिमंडळ अधिकारी अनिल गवळी हे प्रत्येक दुकानदाराकडून दोन ते तीन हजार याप्रमाणे 82 दुकानदारांचे हफ्ते आकारतात. त्याचप्रमाणे या कार्यालयातील पुरवठा निरीक्षक गेल्या सहा महिन्यापासून रजेवर असून पुरवठा निरीक्षकाच्या नावाने व स्वतःचे हफ्ते असे दोन प्रकारचे हप्ता वसुली दुकानदाराकडून करतात. त्याचप्रमाणे वारंवार कार्यालयीन प्रोटोकॉल चा देखील दुकानदारांना आर्थिक झळ सोसावा लागतो.रास्त भाव दुकानदार हे अत्यंत तुटपुंजा कमिशनवर आपले रास्त भाव धान्य दुकान चालवत असून हे रास्त भाव धान्य दुकानदाराच्या कुटुंबाची उपजीविका चे साधन आहे. तसेच माहे नोव्हेंबर पासून दुकानदारांना धान्य वाटपाचे कमिशन न मिळाल्याने आधीच मेथाकुटीस आले आहेत.आजच्या महागाईच्या काळात अशा खंडणीखोर अधिकाऱ्यांना हप्ते देऊन व्यवसाय करणे खूपच त्रासदायक झाले आहे.त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई किंवा त्यांची बदली करावी.अन्यथा दि.१ एप्रिल पासून सोलापूर शहरातील धान्य वितरण बंद ठेवू असे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्याकडे सोलापूर जिल्हा संघटनेच्या संघटनेच्या निवेदनातून कळविले आहे. महाराष्ट्र भरात सर्व शासकीय उपक्रम यशस्वी पार पडणारे तसेच वेळ प्रसंगी दुकानदारांचे न्याय हक्का साठी आंदोलन पुकारणारे चक्क सोलापूर जिल्हा संघटनेने अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिल्याने अधिकाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले आहेत.

 

 

अन्न सप्ताह दिन, ई केवायसी अश्या शासकीय उपक्रम यशस्वी रित्या पार पाडत असताना,अवैधरीत्या गॅस पॉईंट चाळविण्याऱ्यावर तसेच धान्य वाटपात कसूर करणाऱ्या रेशन दुकानावर निलंबनाचे व दंडाचे कारवाई करणारे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे हे आता 2019 पासून एकाच कार्यक्षेत्रात सहा वर्षापासून तळ ठोकून असणाऱ्या परिमंडळ अधिकारी अनिल गवळी यांच्यावर कारवाई करणार का ❓ याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button