crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा जामीन अर्ज मा.न्यायालयाने फेटाळला…

सोलापूर

 

 

फिर्यादी सौ. रेखा कैलास चौधरी, वय-38 वर्षे, व्यवसाय :- नोकरी, रा. 401, अंबिका रेसिडेन्सी, कोटणीस नगर, विजापूर रोड सोलापूर या ओम डायग्नोस्टिक सोलापूर येथे नोकरी करतात, त्यांचे पती कैलास चौधरी हे जलसंपदा विभागामध्ये नोकरीस आहेत. दि. 24/09/2025 रोजी घरातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून, सकाळी 10:00 वा.चे सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले. त्यांचा मुलगा सर्वेश हा सायंकाळी 05:30 वा. ते सुमारास घरी परत आला असता, त्यांचे घराचे कुलूप तोडून, घरातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे रु. 2,47,000/- किंमतीचे दागिने चोरी अज्ञात चोरटयांनी नेल्याने त्यांचे निदर्शनास आले होते. तसेच विशाल नगर परिसरात राहणारे सौ. पुनम सतिश वांगी वय-43 वर्षे व्यवसाय :- गृहिणी रा. ब्लॉक नं.154, विशाल नगर, मेहता स्कूल जवळ, जुळे सोलापूर या दि.24/09/2025 रोजी दुपारी 02:30 वा.चे सुमारास कामाचे निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असता, त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी रु. 22,000/- रोख रक्कम व 06 ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसुत्रे व चांदीचे आरतीचे साहित्य असा सुमारे 1,17,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल चोरुन नेला होता.

 

 

या घटनांबाबत विजापूर नाका पो.स्टे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. 453/2025, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331(3) 305, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर आरोपीतांचा शोध घेत असताना, दि.30/09/2025 रोजी सपोनि शैलेश खेडकर, यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे आरोपी नामे (1) सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने वय-34 वर्षे, रा. मोरया हौसींग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड, पुणे हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली, त्याप्रमाणे त्यास पिंपरी चिंचवड पुणे येथून अटक केली.

 

 

तसेच दि. 04/10/2025 रोजी सपोनि शैलेश खेडकर यांनी गुन्हयातील दुसरा पाहिजे आरोपी नामे, (2) राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर वय-35 वर्षे, रा. मु.पो.वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यास गुन्हयाचे तपासात अटक केली. गुन्हयाचे तपासात आरोपींकडून, सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने, 62 तोळे चांदीचे दागीने व वस्तू व गुन्हा करणेकामी आरोपींनी वापरलेली एक मोटार सायकल, असा एकुण 3,15,200/- (तीन लाख पंधरा हजार दोनशे/-) रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला होता.

 

 

या दोन्ही आरोपीतांना मा.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर, आरोपींनी त्यांचे वकिलामार्फत, मा.न्यायालयात जामीन मिळणेकामी रितसर अर्ज केला होता, गुन्हयाचे तपास अधिकारी सपोनि श्री. शैलेश खेडकर, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी आरोपी नामे (1) सुर्यकांत उर्फ चिन्या अनंतर माने याचेवर सोलापूर, रायगड, पुणे, पिंपरी चिंचवड येथे यापुर्वी असलेल्या घरफोडीच्या सुमारे 13 गुन्हयाची माहिती संकलित करुन मा.न्यायालयात सादर केली. तसेच आरोपी नामे (2) राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर यांचेवर देखील सोलापूर, पुणे येथे यापुर्वी असलेल्या घरफोडीच्या सुमारे 07 गुन्हयाची माहिती संकलित करुन मा.न्यायालयात सादर केली. आरोपी सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने याने चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने, त्याचा मोठा भाऊ चंदया उर्फ चंद्रकांत अनंत माने, रा. पिंपरी चिंचवड, पुणे यांचेकडे दिल्याचे तपासामध्ये सांगितल्याचे तसेच चंदया माने हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याचेवर देखील घरफोडी, जबरी चोरीचे यापुर्वी पुणे, सातारा, सोलापूर, पिंपरी चिंचवड येथे सुमारे 28 गुन्हे दाखल असल्याची माहिती सपोनि शैलेश खेडकर यांनी मा. न्यायालयात सादर केली.

 

 

चंदया माने हा आरोपी राम उर्फ रामजाने क्षिरसागर याचा त्यामधील काही गुन्हयात साथीदार असल्याचे सांगून, त्याचेकडून गुन्हयातील उर्वरीत मुददेमाल हस्तगत करावयाचा आहे, अशी माहिती मा.न्यायालयात सादर केली. दोन्ही अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने व त्याचे वर्तनामूळे महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरीकांचे मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने, मिळविलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने आरोपीस जामीन नाकारण्यात यावा, असे तपासी अधिकारी यांनी म्हणणे सादर केले.

सरकार पक्षाचे वतीने सहायक सरकारी अभियोक्ता ऍ़ड. पी. एस. मांजरे मॅडम, यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे, यावरुन असे दिसते की, त्याचे वागणुकीत काही एक फरक पडत नाही. आरोपी पुन्हा त्याच पध्दतीने गुन्हे करत असल्याचे, निदर्शनास आणुन दिले. सध्या दिवाळी सणउत्सव असल्याने आरोपी पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करतील, तसेच तपासाधीन प्रस्तुत गुन्हयातील उर्वरीत मुददेमाल देखील हस्तगत करणेचे कारवाई पोलीसांकडून चालू असल्याने, आरोपीस जामीन नामंजूर करावा, असे सरकार पक्षाचे वतीने युक्तिवाद मा.न्यायालयात अत्यंत प्रभावीपणे केला. आरोपीचे जामीन अर्जावर मा.न्यायालयात सुनावणी झालेनंतर, तपासी अधिकारी यांनी मांडलेले म्हणणे व सहायक सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरुन मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. 2,  दिपक कंखरे साो, यांनी दोन्ही आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

ही कामगिरी मा. श्री. एम.राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा), राजन माने, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे तसेच  अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, तपास अधिकारी, गुन्हे शाखा सोलापूर शहर, सहायक सरकारी अभियोक्ता, ऍ़ड. पी. एस. मांजरे , तसेच कोर्ट कामकाजात मदत करणारे पोलीस अंमलदार, संदीप जावळे, शुभांगी काटकर, अंबादास जाधव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button