माजी महापौर स्व.महेश कोठे यांच्या स्मरणार्थ निशांत सावळे मित्र परिवाराकडून शहरात ठीक – ठिकाणी पाणपोईचा स्तुत्य उपक्रम…

सोलापूर
सध्या राज्याच्या कडाक्याचे ऊन असून सोलापूर तापमानात महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे.त्यामुळे निश्चित पाण्याची कमतरता सोलापुरात भासवते.त्यातच सोलापूरकरांना ४ दिवसाआड पाणी मिळत असल्याने घरात पाणी साठवून ठेवावे लागत आहे. शहरात बेघर लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात त्यांना पाण्याची सुविधा मिळावी .
वंचित घटकातील कुटुंबांची पाण्याची गरज ओळखून माजी महापौर स्व.महेश कोठे यांच्या स्मरणार्थ निशांत सावळे मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध ठिकाणी पाणपोई उभारण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न किंचित का होईना पण मार्गी लागणार आहे. स्व.महेश कोठे यांचा सामाजिक कार्यात प्रथम पुढाकार असायचा . विकासरत्न महापौर म्हणून स्व.कोठे यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन होता .सोलापूरच्या पाणी प्रश्नाबाबतीत ही त्यांनी सातत्याने आवाज उठवला .त्यांच्या याच सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या स्मरणार्थ निशांत सावळे मित्र परिवाराकडून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
या पाणपोई चे उद्घाटन योगेश पवार, बापू वाडेकर , नाना भोईटे , सागर शितोळे, सचिन गुळग, मनोहर गोयल , राहुल दहीहंडे यांच्या हस्ते करण्यात आले.. हा उपक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी सावळे मित्र परिवार अथक परिश्रम घेत आहेत.