शहर गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरीच्या ६ मोटारसायकली व चोरलेला स्मार्टफोन चोरट्यांकडून हस्तगत…

सोलापूर
रेकॉर्डवरील आरोपींचा शोध सुरू असताना पोलिस उप निरीक्षक शामकांत जाधव व त्यांच्या पथकास सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एक अज्ञात व्यक्ती त्याच्या कडील एक शाईन मोटारसायकल घेऊन संशयित रित्या कुमठा नाका येथील क्रीडा संकुलाच्या मागे असणाऱ्या लेप्रसि कॉलनी सोलापूर येथे थांबला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली . मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उप निरीक्षक शामकांत जाधव व त्यांच्या पथकाने तत्काळ वरिष्ठांना कळवून त्यांच्या आदेशानुसार घटनास्थळी धाव घेतली.सबंधित व्यक्ती कडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव हरी राठोड वय 38 वर्षे रा. प्लॉट नं. 12 गणेश नगर, नवीन आर.टी.ओ. ऑफीसजवळ विजापूर रोड, सोलापूर यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या ताब्यातील शाईन मोटार सायकल वाहन क्र. MH-13-EG-6737 या मोटार सायकलबाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने, “स्टुम फायनान्समध्ये टु व्हिलर रिकवरी एजंट म्हणुन काम करत होतो. सध्या मी हे काम सोडले आहे. पुर्वी, मी स्टुम फायनान्समध्ये काम करत असताना सोलापूर येथील अॅक्सेस बँकेमध्ये लोन असलेल्या व लोन न-भरलेल्या 06 मोटार सायकल सोलापूर शहरातील विविध ठिकाणावरुन उचलुन घेवुन त्या मोटार सायकल अॅक्सेस बँकेच्या डम्प यार्डला न-लावता माझ्याकडेच ठेवुन घेतल्या आहेत.” असे सांगितले. त्यावरुन त्या इसमाकडून गुन्हे शाखेच्या पथकाने 06 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.
आरोपीकडून मिळून आलेल्या मोटार सायकल या नमुद गुन्हयातील चोरीच्या मोटार सायकल असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे करणकुमार हरी राठोड यास दि.20/11/2025 रोजी ताब्यात घेवुन त्याच्याकडून 06 मोटार सायकल जप्त करुन एकूण 4,20,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 06 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या चोरलेल्या मोटार सायकली सदर बझार पोलिस ठाणे,फौजदार चावडी पोलीस ठाणे,येथून चोरल्याची कबुली चोरट्याने पोलिसांना दिली.
तसेच इसम नामे मूजाहीद हमीद मनियार वय 19 वर्षे रा. घर नं. 444/3 खडी मिशनजवळ, नवीन गोदुताई घरकुल, कुंभारी ता.दक्षिण सोलापूर, सध्या रा. ताज मेडीकलच्या पाठीमागे, अशोक चौक, सोलापूर यास दि. 16/11/2025 रोजी ताब्यात घेवुन त्याने चोरलेला 10,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी A14 5G मॉडेलचा मोबाईल फोन जप्त करुन सदर बझार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 919/2025 भा.न्या.सं. कलम 303 (2) अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटार सायकल चोरीचे 06 गुन्हे व मोबाईल चोरीचा 01 गुन्हा असे एकूण 07 गुन्हयातील एकूण 4.30,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन उत्तमप्रकारे कामगिरी केली आहे.
ही कामगिरी, एम. राज कुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उप निरीक्षक शामकांत जाधव व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, राजेश मोरे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी यशस्वी पणे पार पाडली…



