चौधरी फाउंडेशनच्या वतीने रविवारी महाआरोग्य शिबिर….

सोलापूर :
चौधरी फाउंडेशन आणि शांताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 9 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथील संतोषी माता मंदिर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष चेतन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरात विविध आजारावर निदान व उपचारही करण्यात येणार आहेत. कास्य थाळी फूट मसाज, मान, पाठ, कंबर , गुडघे दुखीवर मसाज पद्धतीने उपचार, एक्यूपंक्चर, ॲक्युप्रेशर, निरोपॅथी उपचार, दंत तपासणी, दंत व नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.
मधुमेहावर मोफत औषध उपचार करण्यात येणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शांताई फाउंडेशनच्या लक्ष्मी चव्हाण यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस डॉ. अविनाश काटकर, डॉ. अरुण जडे, महेश अलकुंटे आदी उपस्थित होते…