ब्रेकिंग:- ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत दक्षिणच्या युवा नेतृत्वाचा डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

सोलापूर
विधानसभा निवडणुकीच्या नंतर राजकीय घडामोडींना वेग आला. निवडणुका वेळी घडलेल्या कुरापती पदरात पडलेली नैराश्या यामुळे अनेकांची मने दुखावली गेली . यातीलच एक युवा नेतृत्व चेहरा म्हणजे अमर पाटील. अमर पाटील यांनी ठाकरे गट शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी वेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अनेक कुरापती झाल्या . त्याचा फटका अमर पाटील यांना जोरात बसला. तेव्हापासून आजतागायत अमर पाटील हे पक्षश्रेष्ठींवर प्रचंड नाराज होते. मात्र त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. बुधवारी ठाकरे गट शिवसेनेकडून अमर पाटील आणि उत्तम प्रकाश खंदारे यांच्या हकालपट्टीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. इकडे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री तथा पक्षश्रेष्ठी एकनाथ भाई शिंदे यांचे विचार आत्मसात करत एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत अमर पाटील यांनी प्रवेश केला.
शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अमर पाटील यांना मानणारा स्वतंत्र वर्ग दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. अमर पाटील यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलय. आगे आगे देखो होता है क्या ? ये तो अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असा डायलॉग मारत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. तर ज्येष्ठ नेते उत्तम प्रकाश खंदारे यांनी शिवसेनेत असताना मंत्रिपदाचा कार्यकाळ पार पाडला. उत्तम प्रकाश खंदारे यांनी अशी भूमिका का घेतली? यावर प्रश्नचिन्ह अधोरेखित केले जात आहे. अद्याप त्यांनी या घडामोडीनंतर आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी खंदारे यांच्या निर्णयाकडे सोलापूरकरांचे लक्ष विशेषता लागून राहिले….