माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू 15 विद्यार्थ्यांना सायकली वाटप….
मनोहर सपाटे सांस्कृतिक भवनचे लवकरच लोकार्पणःसपाटे....

सोलापूर, दि. 3-
येथील मराठा समाज सेवा मंडळाच्या मनोहर सपाटे सांस्कृतिक भवन या वातानुकुलित मंगल कार्यालयाचे लवकरच लोकार्पण करणार असल्याची ग्वाही या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक सहा मधील मनोहर सपाटे विचार मंचतर्फे सपाटे यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त 15 गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विनायक पाटील, प्रा. महेश माने, नामदेव थोरात, ज्ञानेश्वर सपाटे,महादेव गवळी, सुजाता जुगदार, मंजूश्री पाटील, राजेंद्र आवताडे, तानाजी माने,सुनीता निकम,सीताबाई गायकवाड,नवनाथ पाटोळे प्रा. संतोष गवळी, प्रा. सचिन गायकवाड, महमद शेख, उदयसिंह पवार, महानंदा सोलापुरे ,अविनाश पाटील,नागनाथ नवगिरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सपाटे यांचा भव्य नागरी सत्कार करून सायकली वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यासाठी मंचचे सदस्य दत्ता जाधव, लखन कारंडे, प्रशांत भगरे, सोमनाथ बचुटे यांचे सहकार्य लाभले. दरम्यान,यावेळी सपाटे यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष किरण महाराज बोधले, लक्ष्मण महाराज चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी जाऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापिका जुगदार यांनी सायकली वाटपामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ होऊन त्यांच्या पालकांचीही आर्थिक बचत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक डुरे -पाटील,भानुदास घंदुरे,दत्ता सुतार,संतोष अलकुंटे, श्रीपादराव जगदाळे, गणेश मुळे , सुरेश जगताप, दत्ता भोसले, विलास झरेकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयश्री साठे यांनी केले तर आभार प्राचार्य मधुकर पवार यांनी मानले.