पत्रा तालीम येथील या पैलवानच्या घरी जाऊन राष्ट्रवादी युवक चे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घेतली औपचारिक भेट …
सुरज चव्हाण यांनी घेतले ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज यांचे दर्शन ...

सोलापूर
राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार स्वराज सप्ताह च्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी शिबिर राज्यात सर्वत्र घेण्यात येत आहे . त्याच पार्श्वभूमीवर शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी सोलापुरात युवकांचा मेळावा घेतला.या मेळाव्याला युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्यानंतर सुरज चव्हाण यांनी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले .
व येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी व अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी सिद्धरामेश्वर चरणी साकडे घातले.
यानंतर मंदिर समितीच्या वतीने सुरज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश सचिव सनी देवकते यांच्या पत्रा तालीम येथील निवासस्थानी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी औपचारिक भेट दिली . यावेळी पैलवान सनी देवकते व त्यांच्या मित्र मंडळींनी तसेच देवकते कुटुंबियांनी फटाक्यांच्या आतषबाजीत हलग्यांच्या कडकडाटात सुरज चव्हाण यांचे जंगी स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो एकच वादा अजित दादा, सुरज दादा चव्हाण तुम आगे बढो हम आपके साथ है , संतोष भाऊ पवार आप आगे बढो हम आपके साथ है या घोषणांनी पत्रा तालीम परिसर दणाणून सोडला होता.यावेळी सुरज चव्हाण यांनी सनी देवकते यांच्या व्यवसाय उद्योगाची माहिती घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुरज चव्हाण यांचे घरी आगमन झाल्यानंतर देवकते कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले.यावेळी पैलवान सनी देवकते यांनी सुरज चव्हाण यांना भरजरी फेटा श्री स्वामी समर्थ चा फोटो देऊन व पुष्पहार घालून विशेष सन्मान केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांचा ही फेटा घालून पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला.
त्याच सोबत उपस्थित पैलवान सनी देवकते मित्र परिवाराकडून ही सुरज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित युवकांशी सुरज चव्हाण यांनी संवाद साधला.सुरज चव्हाण यांनी सनी देवकते यांच्या प्रामाणिक कार्याचे विशेष कौतुक केले. व देवकते कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला….
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पैलवान प्रकाश घोडके ,राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस अमर पाटील,खलील शेख , युवक चे सोलापूर विभाग निरीक्षक संग्राम पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक राकेश कामाटी,युवक अध्यक्ष सुहास कदम, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, यांच्यासह सनी देवकते मित्र मंडळ यांची उपस्थित होती.