राष्ट्रवादी VJNT कडून वकृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धेचे आयोजन…
स्वराज सप्ताह अंतर्गत रुपेश भोसले यांचा उपक्रम....

सोलापूर
शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज सप्ताह साजरा होत असून VJNT विभागाच्या वतीने रुपेश भोसले यांनी घरकुल भागातील भाई छन्नूसिंह चंदेले माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांकरता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर वकृत्व , निबंध, चित्रकला , आणि रांगोळी स्पर्धेचा आयोजन केलं होतं.या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला .
हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून VJNT सेल विभाग प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर VJNT विभाग अध्यक्ष रुपेश भोसले यांनी शिवजयंती स्वराज सप्ताह च्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांचे आयोजन केले होते .
या स्पर्धेत इयत्ता ८ ते १० वीच्या
विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .स्पर्धेत एकूण २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला…
चित्रकला स्पर्धेत्रील विजेते स्पर्धक
प्रथम क्रमांक:–गौरीनंदन म्याकल
द्वितीय क्रमांक:– अक्षता नंदाल
तृतीय क्रमांक:– ओंकार विलासागर
रांगोळी स्पर्धेचे विजेते स्पर्धक
प्रथम क्रमांक:– श्रावणी पिरमल
द्वितीय क्रमांक:– योगना कणकी
तृतीय क्रमांक :– पद्मजा ताळे
निबंध लेखन स्पर्धेतील विजेते स्पर्धक
प्रथम क्रमांक :– साक्षी रेगोटी
द्वितीय क्रमांक:– श्रुतिका पल्ली
वकृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक
प्रथम क्रमांक:– वीरेंद्र पेदरपट्टी
द्वितीय क्रमांक:– आदर्श बन्ने
विजेत्या स्पर्धकास शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, सेवादल विभाग अध्यक्ष प्रकाश जाधव,
युवक संघटक दत्तात्रय महाराज बडगंची,
अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,
महिला आघाडी अर्चना दुलंगे , दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे ,यांच्यासह शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक तोळनुरे सर, गाढवे सर , शिक्षक चिकणे सर, गुंड मॅडम , तडवी सर, सोनवणे सर, क्षीरसागर सर,यांच्यासह विद्यार्थीगण , व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…..