भारतीय संस्कृती आणि चैतन्य टेक्नो प्रशालेची परंपरा : प्रा व्यंकटेश गंभीर…

सोलापूर :
कै. सुरेश सखाराम सुखसे चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन “ स्पंदन “ या सोलापूर शाखेचे उद्घाटन प्रमुख पाहूणे होमी भाभा सेंटर मुंबई चे वैज्ञानिक, प्रा व्यंकटेश गंभीर प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरविंद जोशी, सुर्या ग्रुपच्या वैशाली सुरवसे, सुरवसे हायस्कूलच्या मुख्याध्यापीका उज्वला सांळुके, क्रिडा संघटक पत्रकार रविन्द्र नाशिककर यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक डॉ . बी .एस . राव यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलीत करून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापिका डॉ पी सौजन्या यांनी शाल, पुष्पगुच्छ व प्रतिमा भेट देवून केला. तसेच शाळेचा वार्षिक अहवाल सादर करत प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा व्यंकटेश गंभीर यांच्या हस्ते करण्यात आले, मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले भारतीय संस्कृती जपत विद्यार्थ्यांच्या कला गुणांतून पालकांना प्रबोधन करण्याचे कार्य चैतन्य टेक्नो प्रशाला स्पर्धात्मक युगात अत्यंत प्रभावीपणे करते हे खरोखर कौस्तुकास्पद आहे.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतील त्यांच्या सुप्त कलागुणांना ओळखून विकसीत करावे असे मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका डॉ .पी. सौजन्या, शाखा विकास व्यवस्थापक रुपाली चौधरी, संचालक व्यवस्थापक आदिनारायण पडाल यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरती गजधाटे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशालेची हेड गर्ल कैफिया शेख हिने केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.
शिवजयंती निमित्त तमाम शिवप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
तमाम शिवप्रेमींनी पाळणा सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…
आयोजक :- ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर {नाना} काळे
उत्सवा अध्यक्ष ca सुशील बंदपट्टे
व समस्त श्री शिवजन्मोत्स मध्यवर्ती महामंडळ सोलापूर