मारहाण करून दरोडा टाकल्या प्रकरणी सारोळे ता.मोहोळ येथील सिताबाई गायकवाड,अशोक सुतकर,मधुकर बनसोडे,कृष्णा,गायकवाड,शुभम काटे याची गुन्हा केल्याचे सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता….

सोलापूर
हकीकत ( ) फिर्यादी अनंतकुमार शिंदे व आरोपी सिताबाई गायकवाड अन्य ५ जण, सारोळे अन मोहोळ रहिवसी आहेत. दि. 24/7/2021 रोजी सकाळी 11.30 वा. फिर्यादी यांच्या शेतातील वस्तीवर गेले. माजी सैनिक अशोक सुतकर सिताबाई गायकवाड आणि फिर्यादी अनंतकुमारचा शेतीच्या कारणावरून वाद सुरु झाला फिर्यादी. अनंतकुमारचा खिशातून 2000/ रु काढुन घेऊन ताई शिंदे च्या गलेतील सोन्या बोरमाळ, प्रशांत ऊर्फ सोन्या यांच्या बोटातून सोन्याची अंगठी काढुन जिवे ठार मारण्याचा धमकी. देते जबर मारहाण केली सदर बाबत मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती
सदर फिर्यादी वरूनस डि.एस.पी. प्रभाकर शिंदे यांनी सखोल तपास करून भा.द.वि.कलम ३९५,५०४,५०६,३३ अन्वये आरोपींविरुद्ध दोषारोप दाखल केले होते.
सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जे कटारिया यांच्या समोर सुनावणी होऊन सरकार पक्षा तर्फे एकुण 5 साक्षीदार तपासण्यात आले,बचाव पक्षाचे वतीने अॅड राजेंद्र फताटे यांनी फिर्यादी अनंतकुमार यांनी आरोपी हे अशिक्षित असल्याची गैर फायदा घेत 1 एकर ऐवजी 2.5 एकर शेतजमीन दिशाभूल करून खरीदी करून घेतली होती त्याबाबत विचारणा केली असता उलट आरोपींना मारहाण करून हाकलून दिले, तसेच उलट तपासात तपास अधिकारी यांनी तपासात आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा मिळुन आले नाही असे मान्य केल असे युक्तिवाद केले सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्याय मुतीँ यानी सर्व आरोपींचा निर्दोष मुक्त केले सदर खटल्यात आरोपी तफै अँड राजेंद्र फताटे तर सरकारकडून प्रकाश जन्नु यांनी काम पाहील