maharashtrapoliticalsocialsolapur

वीर शैव समाज बांधवांनी पूनम गेट येथे शुक्रवार पासून सुरू केलेल्या उपोषणास आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला पाठिंबा…

नेमक्या मागण्या काय चला जाणून घेऊ?...

सोलापूर

सांगोला शहरातील मौजे शिवाजी चौक येथील नगरपरिषदेच्या मालकीची व कब्जात असणाऱ्या जागेवरती सन २०२१ – २२ मधील वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत सभागृह बांधण्याकरिता प्रशासकिय मान्यता देण्यात आली होती.या बांधकामास तत्कालीन आमदार यासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या संदर्भात संपूर्ण प्रस्ताव तयार होऊन दिनांक २०/०४/२०२३ रोजी या सभागृह बांधकामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. प्रशासकिय पुर्ततेप्रमाणे प्रत्यक्ष कामकाजास ४/०५/२०२३ रोजी सुरुवात करण्यात आली होती.यावेळी शहरातील काही लोकांकडून बांधकामास तीव्र हरकत घेण्यात आली होती .
यानंतर वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी बांधकामास तीव्र हरकत घेणाऱ्या लोकांविरोधात जिल्हाधिकारी तथा मुख्य न्याय दंडाधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते.याबाबत दैनिकांमध्ये प्रशासनाने वीरशैव लिंगायत समाज बहुउद्देशीय सभागृह बाबत कोणाला हरकत नोंदवायची असल्यास सात दिवसांमध्ये कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते .
वीरशैव लिंगायत समाजाने दिलेल्या निवेदनावर नगर पालिका प्रशासनाने लेखी अथवा तोंडी स्वरूपात कोणतीही माहिती मिळाली नाही या बाबत लिंगायत समाजाच्या वतीने २६/०१/२०२५ रोजी नगरपरिषद कार्यालय समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी दिला होता .

 

 

या निवेदनाच्या आधारे २२/०१/२०२५ रोजी नगर परिषद प्रशासनाकडून पत्राद्वारे लिंगायत समाज बांधवांना व सभागृह बांधकामास विरोध करणाऱ्याना माहितीसतव पत्र दिले.यामध्ये या निवेदनात सभागृह बांधकामास विरोध करणाऱ्या विशिष्ट समाजाने दिलेल्या कागदपत्रांचा बोध होत नसल्याचे सांगत प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करण्यात येत आहे . इतर कुणीही या कामात हस्तक्षेप केल्या कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे लागेल असे पत्रा द्वारे कळविले होते.
मुख्याधिकारी यांनी सभागृह बांधकामास विरोध करणाऱ्या विशिष्ट समाज व वीरशैव लिंगायत समाजासमवेत बैठक घेण्याचे आदेश दिले होते .त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बैठक झाली . या मध्ये कोणताही मार्ग निघाला नाही .या नंतर पुन्हा नगर परिषद कार्यालयात दोन्ही समाजाच्या किमान ४ प्रतिनिधी सह उपस्थित राहण्याच्या आदेशाचे परिपत्रक काढण्यात आले होते.

 

या दोन्ही समाजामध्ये तोडगा काढण्यास विलंब होत असल्याने २६/०१/२०२५ रोजी उपोषण मागे घेण्याची विनंती केली . प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन वीरशैव लिंगायत समाजाने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
दिनांक २८/०१/२०२५ रोजी ठरल्या प्रमाणे वीर शैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी मुख्याधिकारी कार्यालयात हजर झाले . मात्र विरोध करणारे मंडळी या कार्यालयात 12:30 वा.पर्यंत आले नाहीत यानंतर वीर शैव लिंगायत समाज बांधवांनी चौकशी केली असता मीटिंग नसल्याचे व सांगोला नगर परिषदचे मुख्याधिकारी उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.प्रशासनाने राजकीय दबावाखाली येऊन सभागृह बांधकामा मध्ये दिरंगाई केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.काम स्थगित असल्याने निधी ही परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

आता या मध्ये जिल्हाधिकारी यांनी वीर शैव लिंगायत समाजाच्या सभागृह बांधकामाचे काम ७ दिवसात मार्गी लावावे व समाजास न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी समाज बांधवांनी आता न्याय मिळेपर्यंत उपोषणास बसण्याचा निर्धार केला आहे .त्यास शुक्रवार पासून सुरुवात करण्यात आली आहे.या उपोषणास माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपोषण स्थळी जाऊन वीरशैव लिंगायत समाज बांधवांची भेट घेतली .

 

 

व समर्थन दिले. व प्रशासनास तातडीने काम मार्गी लावण्यास सांगितले.उपोषण कर्त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. आता या नंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष विशेत: लागून राहिले आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button