maharashtrapoliticalsocialsolapur

एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या भोजने भगिनींचा आमदार देवेंद्र कोठे यांनी केला सत्कार…

आमदार देवेंद्र कोठे यांनी केला सत्कार भोजने भगिनी संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी : कठीण परिस्थितीत मिळवलेल्या यशाबद्दल केले कौतुक...

 

सोलापूर : प्रतिनिधी

घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या सरोजिनी ज्योतीराम भोजने आणि संजीवनी ज्योतीराम भोजने या भगिनींचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी सामना करून भोजने भगिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने या दोघीही संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. त्यांचे वडील ज्योतीराम भोजने हे गॅरेज चालक आहेत. त्यामुळे स्वाभाविकच त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. परंतु त्याही परिस्थितीत ज्योतीराम भोजने यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करून हे घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे या दोघींचे भविष्य उज्वल आहे. आगामी काळात त्यांना येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी मी मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.

यावेळी संभाजीराव शिंदे प्रशालेचे प्राचार्य अंबादास चाबुकस्वार, विडी घरकुल विभागाचे प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली, माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर, विजय घुले, अनिरुद्ध होमकर, गुरु कटके, दादा गांगर्डे, बाळासाहेब गवळी, नारायण बचुटे, शंकर ताकमोगे, संतोष मोरे, प्रशांत बचुटे, ऋषिकेश केदार, नेताजी कदम, सतीश मोरे, विठ्ठल कदम तसेच गवळी वस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य शोभा यात्रा भव्य शोभा यात्रा भव्य शोभा यात्रा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa