शंकर महाराजांची पालखी विसावली जुनी पोलीस लाईन मधील स्वामी समर्थ मंदिरात.

सोलापूर प्रतिनिधी
पुणे ते अक्कलकोट असा शंकर महाराजांचा निघालेला पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी शहरातील जुनी पोलीस लाईन येथील स्वामी समर्थ मंदिरात स्थिरावला आहे.
शंकर महाराज पालखी सोहळ्याचा मंगळवारचा मुक्काम असून सायंकाळी सहाला पालखीचे आगमन झाल्यानंतर आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले अशी माहिती जुनी पोलीस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे प्रमुख प्रमुख डोंगरे यांनी दिली.
पुणे येथील धनकवडी मधून एक फेब्रुवारी रोजी पालखीचे प्रस्थान झाले आहे. ही पालखी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी कोंडी येथे दाखल झाली होती. सायंकाळच्या सुमारास मुरारजी पेठ जुनी पोलीस लाईन येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये या पालखीचे आगमन झाले. तर बुधवारी सकाळी स्वामी समर्थ मंदिरामधून ही पालखी वळसांग शंकरलिंग देवस्थान येथे मुक्कामी असणार आहे. गुरुवारी अक्कलकोटला ही पालखी पोहोचणार आहे. सुरुवातीला खंडोबा मंदिर व स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र येथेही पालखी जाईल . पालखी सोहळ्याचे प्रमुख किरण लोंढे व भक्तमंडळी, सदस्य नियोजन करीत आहेत. जुनी पोलीस लाईन येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये मंगळवारी रात्री संपन्न झालेल्या महाप्रसाद सेवेत अनेक भक्तांनी सेवा बजावत अन्नदान केले. अशी माहितीही डोंगरे यांनी दिली