शिवछत्रपती चषक’ बुद्धिबळ स्पर्धा खुल्या गटात मानस गायकवाड विजेता…
विविध वयोगटात अनिश, सानवी, विहान, संस्कृती, ज्ञानदा विजेते...

सोलापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शंभूराजे बहुउद्देशीय संस्था, श्री. रामराव शिंदे मित्र परिवार व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजीत केलेल्या ‘शिवछत्रपती चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात अग्रमानांकीत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड याने स्पर्धेत आठ पैकी आठ गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच मानांकित विशाल कल्याणशेट्टी व पवन जल्लीपल्ली यांनी अनुक्रमे द्वितीय व तिसरा क्रमांक पटकाविला.
पुण्याचा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अनिश जवळकर याने सहा गुणांसह व बार्शीची सानवी गोरे हिने आठ पैकी साडेसात गुण मिळवीत उत्कृष्ट खेळ करत अनुक्रमे १५ व १२ वर्षाखालील गटाचे जेतेपद प्राप्त केले. विहान कोंगारी याने १० वर्षाखालील गटात आकर्षक खेळ करत आठ पैकी साडेसहा गुण प्राप्त करत तसेच संस्कुती जाधव व ज्ञानदा संगुळे यांनी अनुक्रमे ८ व ६ वर्षाखालील गटात अव्वल स्थान पटकाविले. जिल्हा परीषद शाळेतील दहा उत्कृष्ट खेळाडूंना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
टाकळीकर मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत लंबे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्मिक विभाग प्रमुख श्रीराम झावरे, बार्शीचे दत्तात्रय गोरे, सोलापूरचे अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, आंतरराष्ट्रीय पंच व संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, अनंतकोटी डेव्हलपर्सच्या संचालिका शिंदे, सौ. लंबे, टाकळीकर समुहाच्या व्यवस्थापिका नीलम उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
विजेत्या खेळाडूंना ‘शिवछत्रपती चषक’, मेडल्स व रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विजेत्या ८५ खेळाडूंना एकूण रु. २८००० ची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे तर त्यांना सहाय्यक म्हणून प्रशांत पिसे, वरिष्ठ राष्ट्रीय पंच वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, यश इंगळे, पद्मजा घोडके यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले.
विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले.
*अंतिम निकाल (अनुक्रमे गुण व बोकोल्स गुणांसह):*
*खुला गट (अनुक्रमे १ ते १०):* मानस गायकवाड – ८, विशाल कल्याणशेट्टी – ६.५,पवन जल्लिपल्ली – ६ (४१), शंकर साळुंके – ६(३८.५), रणवीर पवार – ६(३७), विजय पंगुडवाले- ६(३५), विशाल कल्याणशेट्टी – ६(३७), चंद्रशेखर बसर्गीकर – ५.५(३६), अमित मुद्गुंडी- ५.५(३६), प्रज्वल कोरे – ५.५(३४.५), सागर चौगुले – ५.५(३३)
*१५ वर्षे वयोगट:* अनिश जवळकर – ६(४०), स्वराली हातवळणे – ६(४०), अथर्व रेड्डी – ५.५, गणेश बंदीछोडे – ५(३५.५), साद सय्यद – ५(३१), श्रेयस लागदिवे – ५(३०.५), आदित्य रेवतगाव – ५(२६.५), पलक टकले – ५(२०.५), सोहम शेटे – ४.५(३८), सार्थक उंबरे – ४.५(३२.५)
*१२ वर्षे वयोगट:* सान्वी गोरे – ७.५, श्रेयश कुदळे – ७, वेदांत मुसळे – ६.५, पृथा ठोंबरे – ६(३७.५), ओम निरंजन – ६(३६.५), वल्लभ पटवर्धन – ६(३६), सहिष्णू आपटे – ६(३६), समर्थ स्वामी – ६(३३), विहान राठोड – ५(४२.५), आनंद बंदीछोडे – ५(३७), १० वर्षे वयोगट: विहान कोंगारी – ६.५, वेदांत मुसळे – ६(३५), साशंक जमादार – ६(३४.५), समरजीत देशमुख – ५.५(४०.५), श्रेयश इंगळे – ५.५(३९.५), उत्कर्ष लोखंडे- ५.५(३१), प्रथम मुदगी – ५(३६.५), नैतिक होटकर – ५(३५.५), श्री जोशी – ५(३४), आरव पवार – ५(३४),
*८ वर्षे वयोगट:* संस्कृती जाधव – ५, नमन रंगरेज – ४(१४), नियान कंदीकटला – ४(१३), ऋषांक कंदी – ४(९), रत्नेश घानेगावकर- ३(१४), विवेक स्वामी – ३(१३), पार्थ भांगे – ३(१३), स्वरा निरंजन – ३(१३), यश बंदीछोडे – ३(१२.५), रिषभ कोरे- ३(१२.५),
*६ वर्षे वयोगट:* ज्ञानदा सांगूळे – ३, ओजस पवार – २, विराज शेंडगे – १
*उत्कृष्ट जिल्हा परिषद खेळाडू:* वैष्णवी घंटे, गंगोत्री बिराजदार, आदित्य कसबे, समृद्धी कसबे, संदेश गायकवाड, समृद्धी चंदनशिवे, आदेश गायकवाड, पंचशीला शिंदे, श्रेया चंदनशिवे
*उत्तेजनार्थ बक्षिसे:* सनाया शेख, स्वराज गुळवे
*फोटो ओळी:* ‘शिवछत्रपती चषक’ बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी खेळाडूंसमवेत प्रशांत लंबे, श्रीराम झावरे, महेश धाराशिवकर, दत्तात्रय गोरे, सुमुख गायकवाड, अतुल कुलकर्णी, सौ. शिंदे, सौ. लंबे, उदय वगरे, यश इंगळे आदी.