crimemaharashtrapoliticalsocialsolapur

RTI माध्यमातून मागवली माहिती सिव्हिल हॉस्पीटल ने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून केलेल्या घोटाळ्याचा विठ्ठल व्हनमारे केला पर्दाफाश….

बोगस रक्त चाचण्या करणाऱ्या लॅबची चौकशी अद्याप न झाल्याने आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करणार: व्हनमारे

सोलापूर दि. : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत श्री महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये डॉक्टरांच्या आदेशान्वये विविध रुक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दि ०१/०४/२०२२ ते दि १६/०९/२०२४ या काळातील रक्त चाचण्याचे बोगस बिले काढल्याने दि ०१/०४/२०२२ ते १६/०९/२०२४ या काळरातील जे रक्त चाचण्या लॅबधारक श्री साई डायग्नोस्टिक चे प्रो.प्रा. श्री सोमनाथ स्वामी, प्रकाश हंजगे व डॉ. शैलेश पटणे इत्यादींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्यावतीने दि. २७/०९/२०२४ रोजी मा.अधिष्ठाता श्री संजीव ठाकूर यांच्याकडे समक्ष भेटून शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले होते.

 

 

यावेळी अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी १५ दिवसात चौकशी अहवाल देण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते आज ६ महिने झाले अद्याप कोणतीही चौकशी अहवाल अथवा साधे पत्रव्यवहार देखील सिव्हील हॉस्पिटल यांचेकडून झालेले नाही.

 

 

तात्काळ कारवाई करावी व संघटनेस अहवाल प्राप्त व्हावा यासाठी स्मरणपत्र देवून देखील काही हलचाल न झाल्याने दि. १८/०२/२०२५ रोजी मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण वच आयुष्य द्रव्य विभाग मुंबई व मा. संचालक वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई, मा.ना.श्री. हसन मुश्रीफ साहेब, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना वरळी यांच्याकडे निवेदन दिल्यावर या निवेदनात आपण कारवाई करणार नसाल तर संघटनेच्यावतीने दि २०/०२/२०२४ रोजी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलेला होता.

 

 

 

यावर तात्काळ वैद्यकीय शिक्षण व आयुष्य विभाग यांच्या कार्यालयाकडून दि. २०/०२/२०२५ रोजी मा.अधिष्ठाता श्री छपत्रती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांना चौकशीकरिता आदेश दिलेले असून त्या आदेशान्वये आपले आंदोलन करण्यात येवू नये यासाठी दि २८/०२/२०२५ रोजीच्या पत्रान्वये आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलेले आहे याउपर तात्काळ अधिष्ठाता सोलापूर यांनी संबंधित दोषी लॅबधारक व वैद्यकीय समन्वयक श्रीमती शशिकला जगताप व संबंधित डॉक्टर व कर्मचारी यांचेवर कारवाई न झाल्यास अधिवेशन काळात मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल (भाऊ) व्हनमारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या पत्रकार परिषदेस हरिभाऊ वाघमारे, श्रीनिवास धुळगुंडे, सोपान थोरात, चैतन्य व, घोडके, प्रभाकर शिंदे. आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button