crimemaharashtrasocialsolapur

फसवणूक प्रकरणी कोर्ट रिसीव्हरसह दोघे 18 वर्षांनी निर्दोष:– अँड. संतोष न्हावकर…

 

सोलापूर- एम.आय.डि.सी, अक्कलकोट रोड येथील चमडा कारखानदाराची जागा विक्री करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिराज मुश्ताकअली मर्चंट रा.मुंबई व अल्लाउद्दीन प्यारअली खोजा रा.पुणे यांची मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर(श्री.विक्रमसिंह भंडारी सो)यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

यात हकिकत अशी की, शहर सोलापूर हद्दीतील अक्कलकोट रोड,जम.आय.डि.सी.येथील फिर्यादी श्रीनिवास भगवंतराम गोयल यांची मे.सोलापूर लेदर इंडस्ट्रीज प्रा.लि.नावाची कंपनी असून त्याची स्थापना सन-१९९६ मध्ये करण्यात आली आहे. सदर कंपनीचे नावे पावणे दोन एकर क्षेत्रफळ जागा फिर्यादी, नूरमहमंद विश्राम व कबीर विश्राम यांनी खरेदी केली होती. सदर जागेमध्ये व्यवसाय करण्यासाठी कंपनीने डेव्हलपमेंट क्रेडिट बँक पुणे यांच्याकडून रक्कम रूपये ५४ लाखाचे कर्ज घेतलेले होते ते कर्ज थकलेले होते त्यामुळे बँकेने डीआरटी कोर्टात रिकव्हरी सुट दाखल दाखल केला होती.त्यामध्ये मे.कोर्टाने जागा विक्रीसाठी कोर्ट रिसिव्हर म्हणून अल्लाउद्दीन खोजा यांची नियुक्ती केली होती.तदनंतर सदर दाव्यामध्ये रक्कम रू.३७,९५,४४९/- इतक्या रक्कमेस तडजोड केली होती. त्यानंतर रिसिव्हर म्हणून खोजा यांचे काम संपलेले होते परंतु खोजा यांनी त्यांची अपाँईटमेंटचा कालावधी संपल्यावर दिड वर्षानंतर कबीर विश्राम यांच्या सोबत संगनमत करून त्यांचे मेव्हणे सिराज मर्चंट यांना रुपये ४७ लाख इतक्या रक्कमेस ती मिळकत हस्तांतरीत केली व सदरचे हस्तांतरणपत्र बेकायदेशीर असून सर्वांनी संगनमत करून लाखो रुपयांचा अपहार करून फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद श्रीनिवास गोयल यांनी 1. कबीर विश्राम 2. सिराज मुश्ताकअली मर्चंट व बँकेचे रिसिव्हर 3. अल्लाउद्दीन प्यारअली खोजा यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिस स्टेशन येथे 20/04/2006 रोजी दाखल केली होती.

यात आरोपीविरुद्ध पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. तदनंतर आरोंपीविरूद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षाने एकूण काही साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यादरम्यान आरोपी कबीर विश्राम मयत झाला त्यामुळे बाकी दोन आरोपींविरुद्ध खटला चालला.

यात आरोपीतर्फे अँड.संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना कोर्ट रिसीव्हरची नेमणूक मालमत्ता विक्री करून विक्री दस्त पूर्ण केल्याशिवाय संपत नसल्याने त्यास फसवणूक म्हणता येणार नाही असा युक्तिवाद केला. तो मान्य करून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड वैष्णवी न्हावकर,अँड.राहुल रुपनर,अँड. शैलेश पोटफोडे यांनी,मुळफिर्यादी तर्फे अँड.एस.आर.पाटील यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. अमर डोके यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button