maharashtrapoliticalsocialsolapur

“सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावर लढवणार” – उमेश पाटील…

सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी बैठक आज मोहोळ येथील सावली निवास येथे मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बांधणी, निवडणूक तयारी आणि इच्छुक उमेदवारांच्या भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर लढवण्यासाठी सज्ज राहण्याचे स्पष्ट आवाहन केले.

 

 

 

या बैठकीत माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, मोहोळ व माळशिरस या तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र आढावा बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक तालुक्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांचा कल याचा आढावा घेण्यात आला. याचवेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून मागणी अर्ज स्वीकारण्यात आले.

 

 

 

बैठकीला जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह जेष्ठ नेते बळीराम काका साठे, माजी आमदार संजय मामा शिंदे, प्रदेश प्रतिनिधी कल्याणराव काळे, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, लतिफ भाई तांबोळी, बाळासाहेब बंडगर, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ताई शिंदे, युवती जिल्हाध्यक्ष ऋतुजा सुर्वे, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष नजीर इनामदार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भालशंकर तसेच सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

मार्गदर्शन करताना उमेश पाटील म्हणाले, “संघटना मजबूत करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरण आहे. येणाऱ्या निवडणुका एकजुटीने आणि ताकदीने लढवून सोलापूर जिल्ह्यात घड्याळाचा आवाज पुन्हा बुलंद करू.”
या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी नियोजनबद्ध तयारी करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोलापूर जिल्ह्यात अधिक मजबूत करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button