सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी सोसायटी निवडणूक मध्ये समृद्धी विकास आघाडी विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी आमने – सामने …
१६ फेब्रुवारी पार पडणार मतदान प्रक्रिया....

सोलापूर
सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोलापूर जिल्हा पोलीस सोसायटी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून पोलीस दलातील शहर व जिल्हा मधील कर्मचारी या निवडणुकीत उभे आहेत. यामध्ये समृद्धी विकास आघाडी विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी असे पॅनल एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात वृद्ध विकास उतरले आहे. शहर – जिल्ह्यात कबड्डीचे एकूणच २३४९ सदस्य आहेत .
यामध्ये समृद्धी विकास आघाडीने मतदारांसमोर त्यांचा अजेंडा सादर करताना आज तागायत 36 लाख ते चार कोटी पर्यंत संस्थेचा नफा वाढवला आहे. सर्व कार्यभार स्वच्छ व पारदर्शक ठेवण्यात आला आहे. संस्था डिजिटल आणि ऑनलाईन करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने 14 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारे कर्जासाठी व तत्सम कामासाठी सभासदांकडे कोणत्याही प्रकारची मागणी केली नाही. संस्थेच्या ऑफिस कर्मचारी बद्दल अत्यंत कडक वर्तन संचालकांनी करून त्यांच्या संस्थेमधील हस्तक्षेप फार मोठ्या प्रमाणात कमी केला आहे तसेच यामध्ये आणखी सुधारणा होईल असे अभिवचन अजेंड्यात दिले आहे.
अशा विविध कामांची यादी अजेंड्यात समृद्धी विकास आघाडी पॅनल कडून प्रसारित करण्यात आली आहे.
या दोन्ही पॅनलमध्ये एकूणच 28 उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
तर परिवर्तन विकास आघाडीने त्यांच्या अजेंडात विकास कार्याचा आढावा मतदारांसमोर सादर केला आहे. या निवडणुकीत तात्यासाहेब पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत उमेदवारी अर्ज सहकार उपनिबंधक यांच्याकडे सादर केला होता.
मात्र समृद्धी विकास आघाडी या पॅनलवर व त्यांच्या विश्वासनीय कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून तात्यासाहेब पाटील यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि समृद्धी विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे. या निवडणुकांचे मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार असून प्रचारासाठी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे.
तात्यासाहेब पाटील उमेदवारी अर्ज मागे घेताना
पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या मान्यतेने या निवडणुका शांततेत पार पडत आहेत. दोन्ही पॅनलच्या उमेदवाराकडून आज ताकद केलेल्या कामांच्या जोरावर विजयाचा दवा करण्यात येतोय. समृद्धी विकास आघाडी
या पॅनलचे अधिकृत चिन्ह आहे कपबशी तर परिवर्तन विकास आघाडीचे चिन्ह शिट्टी आहे . दोन्ही पॅनलच्या उमेदवारांकडून प्रचारावर व मतदारांच्या भेटीगाठींवर विशेष भर दिला जातोय…
या निवडणुकीत कोणाचं पारड जड जाणार ? याची उत्सुकता मतदारांना लागून राहिले आहे…