श्री बृहनमठ मठाधीश वीर तपस्वी त्यांना वीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६९ व्या पुण्यतिथी निमित्त बाळीवेस निघाली आत्मज्योत रथोत्सव मिरवणूक…
हजारो भक्त - भाविक शहर - जिल्हातून सहभागी ...

श्री बृहनमठ मठाधीश वीर तपस्वी त्यांना वीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६९ व्या पुण्यतिथी निमित्त बाळीवेस येथील मठापासून होटगी गावातील मठापर्यंत काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी यांच्यासह हजारहून अधिक भक्तांनी होटगी गावापर्यंत आपल्या शिरावर महास्वामीजींची आत्मज्योत वाहिली आणि भक्ती भावाने या मिरवणुकीत सहभागी झाले….
स्वातंत्र्यपूर्व काळात अध्यात्माचा नवीन प्रवाह सुरू करणाऱ्या चरणवीर महास्वामीजी यांच्या ५९ व्या पुण्यतिथी निमित्त हा सोहळा आयोजित करण्यात. आला होता. पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी त्यांची आत्मज्योत मालवली होती. त्याच वेळेला ही आत्मज्योत २ः १० मिनिटांनी या दिवशी प्रज्वलित केली जाते.
त्यानंतर सूर्योदयाच्या दरम्यान ब्रह्म मुहूर्तावर ही ज्योत शिऱ्यावर घेऊन भक्त मंडळी बाहेर पडतात. यंदाच्या वर्षी सध्याचे बृहन्मठाधीश चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी प्रथमच ही ज्योत आपल्या शिरावर ठेवून मठाच्या बाहेर आणली.
त्यानंतर जगद्गुरुनी ती आपल्या शिरावर घेतली आणि या मिरवणुकीत दोघांनीही अनवाणी पदयात्रा केली. यावेळी पाचशे विद्यार्थ्यांनी झांज आणि ढोल पथकाच्या निनादात या पदयात्रेचा उत्साह वाढविला. वेगवेगळ्या ठिकाणी चौकाचौकात उभे राहून यातील अनेक विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून अध्यात्म्याचे महत्त्व समजावून देण्याचे अनोखी काम यंदाच्या वर्षी केले.