BIG Breaking:- गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात ९ गुन्हे उघडकीस आणत ५ लाख ९ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत…

सोलापूर
दिनांक ४/०१/२०२५ ते दिनांक २३/०१/२०२५ या कालावधीत गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख व त्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे शहर परिसरात सतर्कतेने पेट्रोलिंग करत असताना त्यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार (१)आरोपी नाव आयप्पा माळप्पा पारट (२)विशाल शेटीबा देवकर (३)नागेश भीमाशंकर पाटील (४)चंद्रशेखर संगप्पा गुब्याडकर,(५) ऋतिक उर्फ डेविल शंकर गायकवाड (६)उमेश नागनाथ भोसले एकूण ६ आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक सर्वच राहणार सोलापूर यांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपासानंतर शहर पोलिस ठाणे हद्दीत चोरीस गेलेल्या मोटार सायकल चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले . यामध्ये जोडभावी पेठ पोलिस ठाणे , जेलरोड पोलीस ठाणे , सदर बझार पोलीस ठाणे ,हद्दीतील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश मिळाल.
त्याचसोबत १८/०१/२०२५ रोजी गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपिनिय बातमी दाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी व्यंकटेश आरकाल वय ४० वर्षे घर नं २१७ गिरी झोपडपट्टी दत्त नगर सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीच्या अनुषंगाने तपास करून त्याने दिनांक ११/०१/२०२५ रोजी बालाजी मंदिर , सोलापूर जनता बँकेच्या शेजारी दत्त नगर सोलापूर येथून एक ३ तोळे सोन्याचे गंठण कुणाच्याही न कळत घेऊन गेला .पोलिसांनी आरोपी कडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. व पोलिसांनी आरोपीने घेऊन गेलेले ३ तोळे सोन्याचे गंठण हस्तगत केले. व आरोपी वर जेलरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)अन्वये गुन्हा दाखल केला.अशाप्रकारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ८ मोटार सायकल चोरीचे , इतर १ असे एकूणच ९ गुन्हे उघडकीस आणत ५ लाख ९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी, श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, राहुल तोगे, वसीम शेख, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, चापोशि- सतिश काटे, बाळासाहेब काळे, सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड यांनी केली आहे.