maharashtrapoliticalsocialsolapur
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून अध्यक्षांनी मौलाना आझाद महामंडळातून लाभार्थ्याला मिळवून दिले ३ लाख रुपये….

वृत्त सविस्तर
शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच सेल ON graund मोठया ताकतीने कार्यरत आहेत. वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी व विविध योजनांचा लाभ माध्यमातून सोलापूरच्या लाभार्थीपर्यंत पोहचवून सोलापूर शहरच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव तत्पर आहे . याच विषयास अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख यांनी एका तरुण उद्योजकास मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातून ३ लाख पर्यंतचे आर्थिक कर्ज मिळवून दिले.अमीर शेख यांच्या कार्याचे पक्षश्रेष्ठीनी व शहर – जिल्हाध्यक्ष ,कार्याध्यक्ष यांनी विशेष कौतुक केले.यापुढे विविध योजनांच्या माध्यमातून गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी सज्ज असेन अशी प्रतिक्रिया व्यक्त केली .