maharashtrapoliticalsocialsolapur

अन्यथा मनपावर वेळ पडली तर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार या माउलींनी दिला प्रशासनास इशारा…

सोलापूर

 

सोलापूर शहर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाळलेली अथवा वटलेली झाडे बघायला मिळत आहेत.काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या प्रवेश द्वारा समोर वटलेलं झाड कोसळल्याने मोठा अनर्थ घडता घडता वाचला.त्यामुळे अशी झाडे काढून टाकण्यात यावीत अन्यथा झाडं पडून कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास मनपा अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी दिलाय.हेगडे यांनी तसें महापालिकेला लिखित स्वरूपाचे निवेदन देखील दिले आहे.

स्मार्ट सिटीतील प्रमुख रस्ते तयार करताना रस्त्याच्या कडेला पाणी मुरेल अशी व्यवस्था करने गरजेचे होते. मात्र रस्त्याच्या बाजूला म्हणजे कडेला ही सिमेंट किंवा डांबर टाकून पाणी मुरणार नाही अशी व्यवस्था केलीय. त्यामुळे जमीनीत मुरणारे पाणी बंद झाले आहे.परिणामी शहरातील अनेक बोअर आणि हातपंप यांचे पाणी अटले आहे ते कोरडे पडले आहेत.

महापालिकेकडून कचरा उचलणाऱ्या घंटा गाडीवर वृक्ष लागवडीची जाहिरात केली जाते त्यामध्ये उ‌द्यानात वृक्ष लागवड करा असा संदेश दिला जातो मात्र घरा शेजारी किंवा कॉलनीत वृक्ष लागवड करा असा संदेश दिला जात नाही.मनपाकडून रस्ते बनवताना रस्त्यांची उंची वाढवली जातेय मात्र रस्ता कडेला पाणी मुरण्यासाठी जागा ठेवली जात नाही.रस्ते बनवताना रस्त्याच्या कडेला सगळीकडे सिमेंट टाकून रस्ते बनवतात.त्यामुळे शहरातील पाणी पातळी कमी झालीय.भविष्यात पाणी पातळी खालावून मराठवाड्‌याशी सोलापुरची तुलना झाली तर याला मनपा प्रशासन जबाबदार असेल.

शहरात अनेक झाडे वटलेल्या अवस्थेत आहेत. डॉ.आंबेडकर चौक अथवा पार्क चौक येथे जुन्या कामत हॉटेल समोर वटलेले झाड आहे.मरिआई चौक परिसरात रस्त्या कडेला अशीच वटलेली झाडे आहेत.दत्त चौक, दाते गणपती, कसबा, बाळी वेस आशा परिसरात अनेक वटलेली झाडे आहेत.

दाते गणपती परिसरात 95% लोकांचे बोअर उन्हाळा सुरु झाला की कोरडे पडतात त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्यासाठी रस्त्या कडेला वृक्षारोपण करायला महापालिकेने प्रोत्साहन दिले पाहिजे.तसेच रेन हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जेसाठी प्रयत्न करायला हवेत.जी वटलेले झाडे आपण काढणार आहोत त्या ठिकाणी नवीन वृक्षारोपण होणं देखील गरजेचे आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी मनपाकडे आणि जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button