गुन्हेगारीचा शिक्का मिटवण्यासाठी पोलीसांनी गुन्हेगारांना घेतले दत्तक…
गुन्हेगारी समजावर ” पहाट “ उपक्रमांची सोनेरी किरणे ...

सोलापूर
मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून गुन्हेगारी समजातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ” पहाट “ उपक्रमांची पाळेमुळे सोलापूर जिल्ह्यात घट्ट होत आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या उपक्रमामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार समाजास बाहेर काढण्यासाठी विडा उचलला आहे. पोलीस ठाणे हद्दीतील वारंवार गुन्हे करणारे लोकांची यादी तयार केली असून त्यांना व त्यांच्या कुटूंबींना आवश्यक असणारे रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदान कार्ड व आधार कार्ड अशी मुलभुत कागदपत्रे काढून देण्यास मदत केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात काढून दिलेल्या कागदपत्राची संख्या पुढील प्रमाणे.
1) जन्म दाखला 329
2 ) आधार कार्ड 235
3 )जातीचा दाखला 185
4) वाहन लायसन्स 06
5 )अंपक प्रमाणपत्र 08
6 षेती प्रषिक्षण 12 वस्ती
7 )घर बांधणी प्रस्ताव 04
8 )खाजगी नोकरी 36
अशा प्रकारे कागदपत्र काढून देण्यात आली असून यातून पोलीस व गुन्हेगारी समाजातील लोकांचे संबंध सुधारले आहेत. परंतू गुन्हे करण्याची सवय असलेले व गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात घेवून येण्यासाठी त्यांच्याशी पोलीसांचा नियमीत संपर्क येण्यासाठी सदर गुन्ह्यारांना दत्तक घेण्याबाबत सुचीत केले. तसेच त्याची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू केली आहे.
जिल्ह्यातील टॉपचे 10 गुन्हेगार स्वतः दत्तक घेतले आहेत. तसेच अपर पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक स्था.गु. शा.यांना प्रत्येकी 10 गुन्हेगार दत्तक दिले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी यांना प्रत्येकी 05 गुन्हेगार व पोलीस अंमलदार यांना प्रत्येकी 02 गुन्हेगार दत्तक दिले आहेत. यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार हे दत्तक आरोपीच्या नियमीत संपर्कात राहून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहेत.
आज दिनांक 17/01/2025 रोजी मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांषी स्वतः संवाद साधला. त्यांची कौटूबींक पार्श्वभूमी, उदरनिर्वाहाची साधने याबाबत स्वतः माहिती घेतली. तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचे व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पचे योजनाची माहिती देवून त्यासाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.
आज रोजी पोलीस मुख्यालयात यासाठी उपस्थित गुन्हेगार समाजातील लोकांना श्रीमती शैलजा क्यातम, सहायक पोलीस अभियोक्ता, श्री. रामराजे देशमुख, विधी अधिकारी व श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक यांनी गुन्हेगार हे कायद्याच्या कचट्यात सापडल्यानंतर कसे त्यात गुंतत जातात याची उदारणे देवून माहिती दिली. तसेच त्यांची ही गुन्हेगारी कृत्ये समजाता अशांतता निर्माण करतात यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सुध्दा करावी लागते.
श्री. सरतापे, सहायक संचालक, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्क, सोलापूर यांनी देखील गुन्हेगारीतून बाहेर पडू इच्छीतांना शासनाकडील योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी मदत करणार असल्याचे स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमासाठी मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्रीमती शैलजा क्यातम, सहायक पोलीस अभियोक्ता, जिल्हा न्यायालय सोलापूर, सहायक पोलीस अभियोक्ता, श्री. रामराजे देशमुख, विधी अधिकारी गट – ब, मा.श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे प्रमुख म्हणून हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांना विषेश परीश्रम घेतले आहे.