crimemaharashtrapoliticalsocialsolapur

महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर….

महापालिकेने दिले अधिकृत पत्र....

 

सोलापूर :

जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. त्या संदर्भात नूतनीकरण आणि सुशोभीकरण या कामाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर सोपवण्यात आल्याचे अधिकृत पत्र महापालिकेचेवतीने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांना सुपूर्द करण्यात आले आहे .

 

 

जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळा 1985 साली श्री काशी जगद्गुरु डॉ. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सुशिलकुमार शिंदे व महापौर बंडप्पा मुनाळे यांच्या उपस्थितीत झाले होते.

 

 

सदर पुतळ्यास 40 वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे पुतळ्याचे नूतनीकरण व परिसर सुशोभिकरण करणे अत्यावश्यक होते. त्याकरिता आ. विजयकुमार देशमुख यांनी महापालिका मूलभूत सोयी सुविधा या उपक्रमातून 25 लाख व शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 40 लाख रुपये निधी मिळवून दिला. त्यामुळे या कामास गती मिळाली.

 

 

परंतु महापालिका प्रशासन व ठेकेदार यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या संदर्भात महापालिकेने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांच्याशी संपर्क साधला. त्या तांत्रिक कामासाठी श्री रोडगे यांनी तत्परता दाखवली व या कामासाठी सक्रिय योगदान देणार असल्याचे सांगितले. त्यास लागलीच महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर जबाबदारी सोपून अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केले.
या कामासाठी जिल्हा कार्याध्यक्ष बसवराज चाकाई, शहर कार्याध्यक्ष शिवराज विभुते, शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, प्रसिद्धीप्रमुख दत्ता केरे यांचे सक्रिय योगदान राहिले आहे. या कार्याबद्दल बसव ब्रिगेडचे विविध सामाजिक संस्थांकडून तसेच बसव भक्तांकडून अभिनंदन केले जात आहे.

 

 

 

फोटो ओळी : जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याची जबाबदारी बसव ब्रिगेडला सुपूर्त केल्याचे अधिकृत पत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button