crimemaharashtrapoliticalsocialsolapur

ब्रेकिंग:- सोलापूर ग्रामीण जिल्हयतील घरफोडीचे एकूण १५ गुन्हे उघडकीस आणून सुमारे २८ तोळे वनज व १९,२८,५००/-रू किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत…

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद...

मा. श्री. अतुल कुलकणी पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी व अशा प्रकारच्या गुन्हयांना आळा घालून योग्य ती प्रतिबंध करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. सुरेश निंबाळकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून जिल्हयातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक असे मोहोळ शहरात हजर असताना ग्रेड पोलीस उप निरीक्षक ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमी मिळाली की, मंगळवेढा पोलीस ठाणे गु.२.नं. ४५२/२०२४ भा.द.चि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक उर्फ आशिका-या काळे रा. गायकवाड वस्ती, मोहोळ याने त्याचे इतर साथीदारांनी मिळून केला असून तो सद्या मोहोळ येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे यांनी पथकासह त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपूस करता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ आशिका-या छपरू काळे वय ३५ वर्षे रा. भंडारकवठे ता. दक्षिण सोलापूर हल्ली रा. नाईकवाडी प्लॉट, मोहोळ असे असल्याचे सांगितले. त्यास मंगळवेढा पोलीस ठाणे कडील सप्तश्रृंगीनगर येथील घरफोडी चोरीच्या गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला.

 

 

त्यावरुन अधिक संशय आल्याने त्यास विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण विचारपूस करून तपास करता त्याने सांगितले की, मागील सात ते आठ महिन्यापुर्वी त्याने त्याचे इतर साथीदारासोबत मंगळवेढा शहरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याचे सांगितले. या गुन्ह्यातील आरोपी  हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याचेकडे इतर गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने सांगितले की, मागील वर्षभरात त्याने त्याचे साथीदार यांचेसोबत मंगळवेढा शहरात, बठाण गावी, मंद्रुप, मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, दोड्याल, कोंडी, हिरज इ. ठिकाणी घरफोड्या चो-या केल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी एकुण २७५.५ ग्रॅम (सुमारे २८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (बाजारमुल्य भावाप्रमाणे) एकुण १९,२८,५०० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, राजेश गायकवाड, सफी नारायण गोलेकर, पोह/ धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मपोह मोहिनी भोगे, पोकों/सागर ढोरेपाटील, पोकों । अक्षय डोंगरे, यश देवकते, योगेश जाधव, समर्थ गाजरे, चापोना / समीर शेख, यांनी बजावली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, राजेश गायकवाड, सफी नारायण गोलेकर, पोह/ धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मपोह मोहिनी भोगे, पोकों/सागर ढोरेपाटील, पोकों । अक्षय डोंगरे, यश देवकते, योगेश जाधव, समर्थ गाजरे, चापोना / समीर शेख, यांनी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button