सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या DB पथकाकडून चोरीस गेलेले JCB मशीन कर्नाटक मधून जप्त एकूण 30 लाख 25 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत ….

सोलापूर
दिनांक 17.12.2024 रोजी सायंकाळी 06.30 ते दिनांक 18.12.2024 रोजीचे सकाळी 10.00 वा.सुमारास फिर्यादी विश्वराज लालु राठोड, रा.ति-हे तांडा ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर यांचे मालकीचे 30 लाख 25 हजार रूपये किंमतीचा पिवळया रंगाचा 3डीएसएक्स जे.सी.बी.मशीन त्याचा क्रमांक एमएच-13-ईके-6076 हा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला म्हणुन वगैरे मजकुराच्या दिलेल्या फिर्यादी वरून सोलापूर तालुका,पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेला जे.सी.बी. व अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन गुन्हयाची उकल करण्याच्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार मा.श्री.अतुल कुलकर्णी, मा.श्री.प्रितम यावलकर,अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली शोधार्थ असताना पोनि/राहुल देशपांडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे करवी गुन्हयातील चोरीस गेलेला जे.सी.बी हा कर्नाटक राज्यात असल्याची बातमी मिळाली होती.
पोनि/राहुल देशपांडे यांनी मिळालेल्या गोपनिय बातमी गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदार यांना सांगितली होती. मा. श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांना सर्वांना विशेष मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना करून कर्नाटक राज्यात रवाना केले होते.
त्या प्रमाणे गुन्हे प्रकटीकरणा मधील अंमलदार यांनी चोरीस गेलेल्या जे.सी.बी चा मिळालेल्या बातमी प्रमाणे कर्नाटक राज्यात शोध घेतला असता त्यांना बोमनहल्ली ता.सुरपुर जि.यादगीर राज्य कर्नाटक येथुन चोरीस गेलेला जे. सी. बी आरोपीचा शिताफीने शोध घेऊन 30 लाख 25 हजार रूपये किंमतीचा जे.सी.बी. व 2 आरोपी यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करून तपास केला सुरूवातीस त्या दोघांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली.
त्यानंतर त्यांना अधिक विश्वारसात घेऊन विचारपूस करून तपास केला असता त्या दोघांनी त्याचे इतर 1 साथीदार याचेसह गुन्हा केला असल्याची कबुली दिली.अब्बास अली दाऊद साब हेरुर रा. येद्रामी ता.जेवरगी जि. कल्बर्मी वय 24,बाशाखान अल्लाबक्ष नाईक विडी घरकुल बी, कुंभारी ता. द. सोलापूरवय 25,आकाश अशोक सुतार रा. सुतार गल्ली, पडळी खुर्द ता. करवीर जि.कोल्हापूर वय 32 सध्या रा. हत्तुर वस्ती विमानतळ जवळ होटगी रोड सोलापूर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत…
त्यानंतर ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपी व त्याचा एक साथीदार अशा 3 आरोपी यांना दिनांक 01.01.2025 रोजी अटक करून दिनांक 02.01.2025 रोजी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयांनी त्या सर्वांची दिनांक 04.01.2025 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल बनसोडे करीत आहेत.
सदर तिन्ही आरोपी यांचेकडे अशा प्रकारच्या गुन्हयांची उकल होण्याच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस हवालदार नागेश कोणदे, राहुल महिंद्रकर, पोलीस नाईक / लालसिंग राठोड, अनंत चमके, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ, वैभव सुर्यवंशी व सायबर पोलीस ठाणे कडील युसुफ पठाण यांनी पार पाडली आहे.