देव यज्ञ’ च्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोडवल्या नागरिकांच्या अडचणी…
नागरिकांशी संवाद साधत स्वीकारली मागण्यांची निवेदने...

सोलापूर –
विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘ देव यज्ञ’ जनता दरबाराच्या माध्यमातून शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधत मागण्यांची निवेदने स्वीकारली. विशेष म्हणजे यातील अनेक नागरिकांच्या प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी तात्काळ संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या संबंधित प्रश्नांची सोडवणूक केली.
विधानसभा अधिवेशन सत्र, सोलापूरच्या विकास कामाबाबत मुंबईतील वरिष्ठ शासकीय कार्यालयांना भेटी आदी कामांमुळे नागरिकांना भेटण्यास अडचण होऊ नये याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘ देव यज्ञ ‘ जनता दरबार उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे ठरविण्यात आलेल्या दिवशी संपर्क कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारत त्यांच्या अडचणींची सोडवणूक करीत आहेत.
शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत सोलापूर शहरातील शिक्षण, आरोग्य, सामाजिक, अध्यात्मिक, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रातील समस्या घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणावर आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात आले होते. सर्वांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या समस्येवर निश्चितपणे सकारात्मक उपाययोजना होईल, असे सांगत आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत आश्वस्त केले. तर काही शासकीय कार्यालयांची तत्काळ संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या. तसेच आवश्यक त्या कामांसाठी शिफारस पत्रेही दिली. शहर विकासाबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांनी कौतुक केले.
——-
कोट
‘देव यज्ञ’ राहणार कायम
संवाद जनतेशी, ‘देव यज्ञ’ सेवेशी हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सोलापूरकरांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘देव यज्ञ’ जनता दरबार हा उपक्रम सुरू केला आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार म्हणून कटिबद्ध आहे. सोलापुरातील नागरी समस्यांवर शाश्वत उपायांसाठी आगामी काळातही ‘देव यज्ञ’ कायम राहणार आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य विधानसभा