राष्ट्रवादी महिला आघाडी व सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त संयुक्तिक उपक्रम….
प्रसार माध्यमात मोलाचे योगदान देणाऱ्या नारी शक्तीचा सन्मान....

सोलापूर
राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर,निरीक्षक दिपाली पांढरे यांच्या सुचनेनुसार शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी व सोलापूर श्रमिक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्कार मुर्तीना या कार्यक्रमात भगवे फेटे परिधान करण्यात आले होते
महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विविध स्थानिक वृत्त वाहिनी, लोकप्रिय दैनिक , जाहिरात विभाग , व आकाशवाणी माध्यमांमध्ये कार्यरत राहून मोलाचे योगदान देणाऱ्या नारी शक्तीचा सन्मान सोहळा यावेळी करण्यात आला . सत्कार मुर्तीना श्री स्वामी समर्थांची व लक्ष्मीची प्रतिमा ,गुलाब पुष्प, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष या कार्यक्रमाचे आयोजक चित्रा कदम, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे , सरचिटणीस सागर सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे यांची उपस्थिती होती.
महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी त्यांच्या भाषणात उपस्थित माध्यम क्षेत्रातील सत्कार मुर्तीना शुभेच्छा दिल्या.