बांधकाम कामगार शिबिरातून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने दिला कामगारांना आधार….

सोलापूर
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शनिवारी सकाळी बांधकाम कामगार नवीन नोंदणी आणि नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, देविदास घुले यांच्या सह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारीआणि कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली, ज्या बांधकाम कामगार महिलांना नूतनीकरण नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या त्या सर्व बांधकाम कामगारांना शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने मोफत नोंदणी शिबीर आयोजित करून आधार दिला.
यावेळी शेकडो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, आणि आपली नोंदणी करून घेतली, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने नूतनीकरण आणि नोंदणी शिबीर आयोजित केल्याने महिलांनी मंडळाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आणि शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचे आभार मानले