प्रभाग १७ लोधी गल्ली येथे महासेवा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,शिबिरात १९६२ नागरिकांनी लाभ घेतला..
"आमचं ठरलय" म्हणत राज्यात देवेंद्र सोलापूरात ही देवेंद्र हेच समीकरण असणार मतदारांचा निर्धार...

सोलापूर
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या महासेवा शिबिराला हजारो नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांचा लाभ घेतला. हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल हजारो नागरिकांनी देवेंद्र कोठे यांचे आभार मानले.
बुधवारी लोधी गल्ली,नळ बाजार चौक लष्कर येथील बालाजी मंदिर परिसरात महासेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सकाळपासून सायंकाळपर्यंत हजारो नागरिकांनी महासेवा शिबिराला भेट दिली. युवा नेते देवेंद्र कोठे,आणि या भागातील नगरसेवक रवी कैय्यावाले, गुलजारसिंग शिवशिंगवाले, माजी परिवहन सदस्य रवीजी बुऱ्हाणपूरे, अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस अनंत गोडलोलू, भीमा आसादे,विजय धोत्रे यांनी दिवसभर महासेवा शिबिरामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करत होते.
या महासेवा शिबिरामध्ये मतदार नोंदणी आणि मतदान कार्ड दुरुस्ती, आधार नोंदणी आणि दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड, रेशन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती, बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय प्रक्रिया करण्यात आल्या. दिवसभरामध्ये १९६२ नागरिकांनी महासेवा शिबिरात येऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये माजी महापौर.सौ श्रीकांचनाताई यन्नम, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सौ रेणुकाताई गोडलोलू, शहरमध्य नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, भाजपा ज्येष्ठ नेते जक्कप्पा कांबळे, मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष संतोष कदम,अविनाश बेंजरपे, चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, मध्यपूर्व मंडल उपाध्यक्ष श्रीनिवास पोतन, सोशल मीडियाचे अभिषेक चिंता अंबादास सकिनाल अविनाश बेंजरपे,गुरुनाथ कवाडे यांनी या शिबिरास भेट दिली.
तसेच विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य सिद्धेश्वर कमटम,पवन खांडेकर,अश्विन कोडम,शैलेश कडदास,सागर भोसले,गणेश बत्तुल,अमन दुबास, अंबादास माडेकर,राहुल म्हेत्रे,नागेश म्हेत्रे,सागर बल्ला,उदय कनकी, विक्रम कमली,सोमेश येलगेटी,बंटी कटकम,अमोल कोंड्याल, त्रिमूर्ती बल्ला, व प्रमुख सदस्य उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून हे शिबिर यशस्वी संपन्न झाले.