crimemaharashtrapoliticalsocialsolapur

जन्मठेप झालेल्या पतीस उच्च न्यायालयात जामीन:- ॲड. जयदीप माने…

सोलापूर
सावळेश्वर, ता. मोहोळ येथे पत्नी स्वाती हिचा चरित्राच्या संशयावरून लोखंडी रॉड ने मारून खून केल्याच्या आरोपावरून बाळू दादा जाधव, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ याचे विरुद्ध मोहोळ पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालय झाली होती. आरोपीचा मुलगा प्रकाश याने वडिलाविरुद्ध न्यायालयात साक्ष दिली होती. त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवून सोलापूर सत्र न्यायालयाने आरोपी बाळू जाधव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

HTML img Tag Simply Easy Learning

 

 

सदर शिक्षेविरुद्ध आरोपी बाळू दादा जाधव याने ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते .सदर अपीलात जामीन अर्ज दाखल केलेला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच चे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठांसमोर झाली. खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आणि आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

 

या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. ए. ए. नाईक यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button