२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहचे आयोजन …

सोलापूर —
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर दरवर्षीप्रमाणे “दक्षता जनजागृती सप्ताह” साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी हा सप्ताह दि. 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने आज दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा अनुषंगाने आज शपथ घेण्यात आली.
महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता व पारदर्शक प्रशासनाची शपथ घेतली. शासन प्रशासनामध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि पारदर्शकता या मूल्यांचा प्रसार करणे व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हा या आठवड्याचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलाणी, सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भीष्णूरकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका आकूलवार यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनातील प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव व पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, नागरिकांचा विश्वास जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यात प्रामाणिकता आणि दक्षता ठेवणे आवश्यक आहे.



