अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : आरोपीने वकील बदलण्याचा अर्ज दिल्याने खटल्याची सुनावणी लांबणीवर….

सोलापूर
दिनांक- एडवोकेट राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर टी ओ सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाला.
यात हकीकत अशी की, दिनांक 8-6-2019 रोजी यातील मयत अँड राजेश कांबळे हा सकाळी अकरा वाजेचे सुमारास पक्षकारांना भेटून एका तासाने परत येतो असे त्याच्या पत्नीस सांगून त्याच्या घरातून मोटरसायकलवर निघून गेला होता.
त्यानंतर त्याच्या पत्नीने दुपारी बाराच्या सुमारास फोन लावला असता मयत राजेश याने मी बंटीच्या घरी आहे केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले .त्यानंतर त्याची पत्नी त्याचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागत होता. रात्री शोधा शोध केली तरी मयत राजेश कांबळे हा मिळून आला नाही. त्यावर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला तसेच पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हात, पाय,धड व मुंडके हे तोडून दोन प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले. त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेले वरील तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.
आज रोजी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपी ऍड.सुरेश तारू चव्हाण याने त्याचे वकील हे संपर्क केला असता, ते फोन उचलत नाहीत, मेसेज केल्यास मेसेजला उत्तर देत नाहीत त्यामुळे वकील बदलण्यासाठी अर्ज केला त्यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हरकत घेतली त्यावर न्यायाधीशांनी आरोपी एडवोकेट सुरेश चव्हाण यास हजर असलेल्या साक्षीदारांना प्रत्येकी 500/- रुपये भत्ता देण्याचा आदेश केला.
या खटल्याची पुढील सुनावणीस 22/01/2025 ही तारीख नेमण्यात आली.
या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे आरोपी, आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदीप माने हे काम पाहत आहेत.