प्रभाकर महाराज चौक येथे परिवहन महामंळाच्या बसेसवर अज्ञात समाज कंटकांकडून दगडफेक…
दगडफेकीत शासकीय मालमत्तेचे नुकसान....

सोलापुरात
यात थोडक्यात हकीकत अशी की यातील फिर्यादी कैलास आनंदराव हेंडगे वय 38 वर्षे व्यवसाय एस. टी.चालक रा. गौळ तालुका कंदार जिल्हा नांदेड हे परिवहन मंडळाची बस वाहन क्रमांक MH 14 BT 4952 ही स्वतः चालवत होते . प्रभाकर महाराज चौक सोलापूर येथून ही बस जात असताना तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केली.यात बसचे प्रचंड नुकसान झाले.या घटनेतील साक्षीदार नाव बालाजी दत्तात्रय गंगणे हे परिवहन मंडळाची चालवीत असलेली बस वाहन क्रमांक MH 05 EM 1382 या वाहनावर ही त्या तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली .
यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्या कारणाने त्या तीन अज्ञात व्यक्तीं विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर 719/2024 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 324(3),(3)5, व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम (3)1प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ.विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग १ प्रताप पोमन, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे , सहाय्यक पोलिस निरीक्षक धायगुडे, खंडागळे हे आपल्या फौजफाट्यासह घटास्थळी दाखल झाले.
व परिस्थिती आटोक्यात आणली.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडागळे करीत आहेत .या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह सोलापुरात देखील कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे….