सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या ” स्नुफी ” श्वासाने केली कमाल पुणे येथील स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक …
पोलीस आयुक्तांनी केले श्वानाचे विशेष कौतुक...

दिनांक 06/12/2024 ते दिनांक 12/12/2024 या कालावधीत 19 वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. सदर स्पर्धेस पोलीस आयुक्तालय, सोलापूर आस्थापनेवरील ” स्नुफी ” या श्वानास घेवून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
या स्पर्धेत श्वान पथक सोलापूर कडील ” स्नुफी “या श्वानाने “वस्तुच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणे व वासावरून गुन्हेगाराला ओळखपरेड मध्ये ओळखणे ” या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यामध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला आहे.
सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर मा.डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) व राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली श्वान पथक सोलापूर शहरकडील सफौ/लक्ष्मण साबतेबुवा गणगे, पोह/205 शिवानंद सिद्रामप्पा कलशेट्टी व पोशि/1209 रतन बाबासाहेब गनुरे यांनी केली आहे. तरी सदरची बातमी आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द होणेस विनंती आहे.