चैत्यभूमी येथे महामानवास स्मृतिस्थळी सोलापूर शहर राष्ट्रवादी कडून अभिवादन…

मुंबई उद्या 6 डिसेंबर महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण राज्यभरातून चैत्यभूमी येथील स्मृतिस्थळावर लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी अभिवादन करण्याकरिता येत असतात
6 डिसेंबरच्या पूर्वदिनी 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.10 वाजता चैत्यभूमी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रांतिक सदस्य महेश निकंबे यांच्या हस्ते स्मूर्तीस्थळाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले
व विनम्र पूर्वक अभिवादन करण्यात आले ..
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माझी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते महेश निकंबे युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे VJNT सेलचे अध्यक्ष रुपेश भोसले सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.