“तुला खल्लास करतो” अशी धमकी देत चाकूने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्या वाहनचालकावर जीवघेणा हल्ला…
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद...
सोलापूर
या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की यातील फिर्यादी संभाजी अप्पाजी कोडगे वय वर्षे ३१ व्यवसाय वाहनचालक .राहणार ५३ हांडे प्लॉट संभाजी महाराज चौक सोलापूर
हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत.g पुरूषोत्तम बरडे यांचे चौत्रा पुना नाका गणेश उत्सव मंडळ आहे .या मंडळाचे माजी अध्यक्ष गणेश सुधाकर शिंदे हे रिक्षा चालक आहेत. कोडगे व शिंदे एकाच मंडळाचे सदस्य आहेत .दिनांक ३०/११/२०२४ रोजी रात्री ११:१५ वा. च्या सुमारास जुना पुना नाका येथील पावन गणपती मंदिरा समोर संभाजी कोडगे हे त्यांच्या मित्रा सोबत जेवण करून येऊन मित्रा समवेत थांबले होते. कोडगे हे त्यांच्याकडील असलेल्या दुचाकी वाहन क्रमांक MH 13BF7040 वरून त्यांच्या राहत्या हांडे प्लॉट संभाजी महाराज चौक सोलापूर कडे मार्गस्थ होत असताना गणेश शिंदे यांनी कोडगे यांचा पाठलाग करून रस्त्यातच संभाजी यांना अडवून शिवीगाळ करत तु माझ्याकडे बघून थुकतो का ? असा जाब विचारत शिवीगाळ करू लागले .
घटनेचे CCTV फुटेज कॅमेरात कैद
संभाजी कोडगे यांनी मी असले कोणतेही कृत्य केले नाहीय असे शिंदे यांना सांगितले .तरी ऐकण्याच्या मानसिकतेत नसलेल्या गणेश सुधाकर शिंदे यांनी त्यांच्याकडील असलेला चाकू काढला व जीवे मारण्याची धमकी देत “तुला लई मस्ती आली आहे “ तुला आता खल्लास करतो म्हणून दमदाटी करू लागले .त्यावेळी बाजूला उभे असलेले अमृत थिटे व श्रवण खटाळ यांना हे दृश्य निदर्शनास पडले.
यावेळी थिटे व खटाळ दोघांनी ही शिंदे यांची समजूत काढून सुधाकर शिंदे व संभाजी कोडगे यांना घटनास्थळावरून पाठवून दिले.आपल्या जीवितास गणेश सुधाकर शिंदे यांच्याकडून धोका असल्याने संभाजी कोडगे यांनी सुधाकर शिंदे वय वर्षे ५० . रा.अभिमान श्री नगर मुरारजी पेठ सोलापूर यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुधाकर शिंदे विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १२६(२),३५१(३),३५२ ,शस्त्र अधिनियम १९५९ नुसार ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे .याचा पुढील तपास पोलीस शिपाई रमेश भद्रशेट्टी हे करत आहेत….
हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा