लाडकी बहिणींच्या मतदानरूपी आशिर्वादने महायुतीचा ऐतिहासिक विजय:- संतोष भाऊ पवार…
या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली :- अमोल बापू शिंदे...

महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या पाठीशी राज्यातील लाडक्या बहिणी:- नरेंद्र काळे
लोकसभा निवडणुकी नंतर राज्यात चर्चा होती ती विधानसभेची .या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष विशेषत: लागून राहिले होते. अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटे की टक्कर एकंदरीत पाहायला मिळाली . मात्र यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली आणि राज्यातील महायुती उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे लाडक्या बहिणी उभे राहत महाविकास आघाडी च्या उमेदवारांचा सपडा सुड करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मोदी है तो मुमकिन है असा विश्वास मतदारांमध्ये संपादित करत विविध योजनांच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकास केला. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेला तीव्र हरकत घेतली होती मात्र राज्याच्या सक्षम सरकारने विरोधकांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत लाडक्या बहिणींना योजनेचा सर्वाधिक फायदाच करून दिला . महायुती सरकारला राज्यात 234 तर महाविकास आघाडी सरकारला 50 जागा मिळाल्या.
महाविकास आघाडी मधील अनेक दिग्गज नेत्यांना राज्यातील मतदारांनी “ना घर का ना घाट का “ अश्या संभ्रम अवस्थेत टाकत घरचा रस्ता दाखवला. सोलापूर मध्ये तिन्ही मतदार संघातील उमेदवारांचा दणदणीत विजय झाला . विरोधकांच्या पोकळ आश्वासनांना मतदारांनी मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे पसंत केले.
आणि मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासावरच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला.त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी व घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपापल्या पदाधिकाऱ्यांसह जल्लोष साजरा केला.गुलालाची मुक्त उधळण करत,हल्ग्यांचा कडकडाटात फटाक्यांची आतिषबाजी आणि विजयी मिरवणूक काढून हा जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, महायुती सरकारचा विजय असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. महायुतीतील प्रमुख पदाधिकारी यांनी एकमेकांना मिठाई खाऊ घालून विजयाचा आनंद साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे,भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह जेष्ठ नेते, प्रांतिक सेलचे सर्वच प्रमुख पदाधिकारी नेते , फ्रंटल सेलचे अध्यक्ष ,कार्याध्यक्ष , पदाधिकारी महिला आघाडी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी महायुती सरकारने केलेल्या राज्याच्या सर्वागीण विकासाच्या जोरावर मतदारांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता मत पेटीतून चोख प्रत्युत्तर देत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचंड मताधिक्याने विजय केला . या विजयात लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे.हा विजय केवळ महायुतीचा नसून तो मतदारांचा आहे .यापुढे देखील महायुतीचे हे आपल्या हक्काचे सरकार विविध योजनांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास करण्यावर यापेक्षाही अधिक भर देईल . मतदारांचे आभारी आहोत .विजयी उमेदवारांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली..
महायुतीचे उमेदवार सलग पाचव्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजपा व राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समवेत विजयाचा आनंद साजरा केला.सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तदनंतर चार हुतात्मा चौक , पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात हा विजय केवळ महायुती सरकारचा नसून तो मतदार राजाचा आहे . देशाचे विकासरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील आपल्या हक्काचे सरकार वेगवान पद्धतीने राज्याचा सर्वांगीण विकास करत आहे.
आणि या विकासाच्या जोरावरच राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत सोलापूरच्या सर्वांगीण विकास साधण्यावर विशेष भर दिला जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सोलापूरच्या विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या….