स्वराज सप्ताह निमित्त महाविद्यालयीन युवतींन साठी सेल्फ डिफेन्स कार्यशाळा…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांचा स्तुत्य उपक्रम...

सोलापूर
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, अध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार राज्यात सर्वत्र स्वराज सप्ताह जल्लोषात सुरू असून युवती विभाग प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली , शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान , प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव , आनंददादा चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज सप्ताह निमित्त बुर्ला कॉलेज राजेंद्र चौक येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता प्रभू सर यांचे सेल्फ डिफेन्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
विद्यार्थ्यांना आत्म संरक्षणाचे धडे मिळावेत संकट परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी तयार होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी प्रास्ताविकेत सांगितली .
तर शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या भाषणात स्वराज सप्ताह निमित्त किरण माशाळकर यांनी घेतलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक करत अशा कार्यशाळा आयोजित करणे ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली…..
या कार्यक्रमास व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, जेष्ठ नेते प्रा श्रीनिवास कोंडी,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवक प्रदेश सरचिटणीस खलिल शेख , अर्चना दुलंगे,युवती विभाग कार्याध्यक्ष कोमल मनुरे , शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, यांची उपस्थिती होती.