maharashtrapoliticalsocialsolapur

जेमिनी नवरात्रोत्सवात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महिषासुरमर्दिनी मातेची महापूजा

सुरेश (अण्णा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५५ वर्षांपासून उत्सवाची परंपरा; सामाजिक उपक्रमांचे आमदार सचिन कल्याणशेट्टींन कडून कौतुक

 

सोलापूर :

 

 

 

भवानी पेठेची माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेमिनी सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या नवरात्र महोत्सवात अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महिषासुरमर्दिनी मातेची धार्मिक विधिवत पुजन व महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंडळाचे आधारस्तंभ तथा माजी सभागृह नेते सुरेश (अण्णा) पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, राजकारणात अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून सुरेश (अण्णा) पाटील यांची जनसामान्यांमध्ये वेगळी ओळख आहे. त्यांच्या पाठीशी युवकांची मोठी फळी उभी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ५५ वर्षांपासून आजतागायत जेमिनी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. धार्मिक उत्सवाबरोबरच मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

 

 

 

 

ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मंडळाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जोपासली जात असल्याचे नमूद करत आमदार कल्याणशेट्टी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांच्यासह बाबुराव जमादार, बसवराज जाटगल, नरसप्पा मंदकल, सायबण्णा मुडल, संजय होमकर आणि गंगाराम डोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष सचिन म्हेत्रस, कार्याध्यक्ष उमेश जमादार, बिपीन पाटील, सागर आतनूरे, प्रवीण कैरमकोंडा, सुरेश मंदकल, विनायक पाटील, मुदका करली, रमेश मंदकल, यशवंत पुराणीक, यासीन नालवार, नूरहमद नलवार, श्रीकांत दासरी, व्यंकटेश जाटगल, मल्लू कोळी, शिवा मंदकल, रेवण वग्गूर, सिद्राम हल्ली, संतोष कर्ली, प्रवीण डोळ्ळे, रवी मंदकल, अक्षय कलशेट्टी, संतोष जेरकल, नितीन चिलवेरी, सिद्राम मंदकल, आकाश जमादार, गणेश मल्लूरे आणि नवीन गोटीमुकुल यांच्यासह मंडळाचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सभासद आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

महापूजेनंतर भाविकांनी महिषासुरमर्दिनी मातेचे दर्शन घेतले. धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात महापूजा सोहळा संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button