४ हजार महिलांचा आशीर्वाद विजय देशमुखांना…
आमदार विजयकुमार देशमुखांसाठी हळदी कुंकू च्या निमित्ताने केला पाणीवेस तालमीने संकल्प....
प्रभाग क्र.८ मधील महिलावर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद
महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी सायंकाळी गणपती घाट येथील सरस्वती प्रशालेच्या प्रांगणात ४ महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन पाणीवेस तालीमच्या वतीने करण्यात आला होता…
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, आई प्रतिष्ठानचे सृष्टीताई डांगरे, डॉ. उर्वशी किरण देशमुख, साक्षीताई विक्रांत वानकर, माजी शिक्षण सभापती संध्या गायकवाड, अरुणा सुभाष पवार, दीपाताई पंकज काटकर, शीलाताई देशमुख, प्रतिभा प्रसारे, रंजीता चाकोते,शोभा नष्टे,डॉ. किरण देशमुख,अमर पुदाले, माजी नगरसेवक विक्रांत वानकर,पाणीवेस तालमीचे अध्यक्ष उदय रुपनर, महादेव पवार, प्रसाद झुंजे, अमित लाड, केतन अंजीखाणे, शुभम वाघदुगी,गुंडू हरसुरे, ओंकार पवार आणि पाणीवेस तालीम चे पदाधिकारी उपस्थित होते…..
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने अनेक योजना आणल्या. लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी विरोध करीत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये गेले. भावाकडून मदत होणारी मदत होऊ नये म्हणून या योजनेला स्टे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपये ऐवजी २१०० रुपये करणार असल्याचे सांगितले आहे. माता-भगिनीकडे वाकडे नजर ने पाहणाऱ्यांना या सरकारने गोळ्या घातल्या आहेत. आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या सत्तेतले सात वर्षाच्या कार्यकाळात स्मार्ट सिटी योजना,दुहेरी पाईपलाईन योजना, घरकुल आवास योजना शहरातील सुधारलेले रस्ते, बंदिस्त गटारी यास अनेक विकास कामे झाली आहेत. दुहेरी पाईपलाईन योजनेमध्ये ९० टक्के काम पूर्ण झाले असून फेब्रुवारी पर्यंत काम पूर्ण होऊन एक दिवसात पाणी मिळण्यासाठी आमदार देशमुखांच्या माध्यमातून काम सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमदार देशमुखांना भरभरून मतदान करावे असे आवाहन युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी केले…
पाणीवेस तालीमने महिलांसाठी चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे.हळदी कुंकू च्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिलांमुळे या भागातचैतन्य पसरले आहेत.येथील महिलांनी आमदार विजयकुमार देशमुख,अमर पुदाले आणि भाजपला सतत मतदान केले आहे.यंदाही आपल्या नागरिकांशी सतत संपर्कात राहून आपल्या अडीअडचणी सोडवणारे विजयकुमार देशमुख यांनाच निवडून देण्याचे आवाहन माजी विरोधी पक्ष नेता रोहिणी तडवळकर यांनी यावेळी केले…..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना चाटी, संगीता जाधव, श्रद्धा अध्यापक, कविता अष्टगी, विजया माशाळकर, कीर्ती देशपांडे, अंजली गुरव यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ आणि पाणीवेस तालीम येथील महिला मंडळींनी परिश्रम घेतले….